40 वर्षांपासून प्रलंबित वरवंडी खडांबे शिवरस्ता ना. तनपुरेंच्या सहकार्याने खुला करण्यात यश - सरपंच कोळेकर

अहमदनगर/ जावेद शेख : वरवंडी गावचा मुख्य शिवरस्ता, गावाची जीवनवाहिनी असलेला आणि जीवन मरणाचा प्रश्न बनलेला वरवंडी खडांबे शिवरस्ता अखेर आज पूर्णपणे खुला करण्यात आला. त्यावेळी ग्रामपंचायत मासिक सभेत बोलताना सरपंच भाऊसाहेब कोळेकर यांनी हे उदगार काढले.

यावेळी बोलताना सरपंच म्हणाले की सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्या पासूनच गावचा सर्वांगीण विकास करणे हे ध्येय उराशी बाळगले होते. गावचे शिवरस्ते आणि सर्व जोडरस्ते चालू असणे हे विकासासाठी अतिशय आवश्यक होते. अशा परिस्थितीमध्ये अनेक वर्षांपासून बंद असलेला वरवंडी खडांबे हा गावाची जीवन वाहिनी असलेला रस्ता खुला करणे हे आमच्यासमोर एक मोठे आव्हान होते. परंतु गावचा विकास व्हावा ही इच्छा असल्यामुळे आणि सर्व गावकऱ्यांच्या साथीनेच हे शक्य झाले असे ही कोळेकर म्हणाले.

गावचे आदरणीय ज्येष्ठ नागरिक, माजी तंटामुक्ती अध्यक्ष त्रिम्बक पाटील अडसुरे आणि सध्याचे तंटामुक्ती अध्यक्ष शरद ढगे यांच्या देखरेखीमध्ये सदर रस्ता खुला करण्यात आलेला आहे. यासाठी मेजर बेल्हेकर (तलाठी) यांनी रस्त्याचा नकाशा उपलब्ध करवून कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका उपाध्यक्ष सलीमभाई शेख, ग्रामपंचायत सदस्य जगदीश भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष जालिंदर अडसुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते नवनाथ ढगे, राजूभाऊ पवार, माजी सरपंच श्रीकांत ढगे, ग्रामपंचायत सदस्य बंटी अडसुरे, राजूभाऊ अडसुरे, बाबासाहेब अडसुरे, संजु अडसुरे, नामदेव ताकटे, ज्ञानदेव ताकटे, पञकार जावेद शेख, समीर शेख, रशिदभाई शेख, असिफ शेख, बापूसाहेब अडसुरे, मधुकर भालेराव, भागवत भालेराव, अनिल ढगे, भाऊसाहेब माने, अफोज शेख, पप्पू बर्डे, दगडू बर्डे, दिगंबर ताकटे, सलमान शेख यांनी स्वतः उभा राहून रस्ता खुला करवून घेतल्याबद्दल कोळेकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. 

तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेले शेतकरी ज्यामध्ये श्रीम. वत्सलाबाई भालेराव, राजूभाऊ अडसुरे, रविंद्र भालेराव, बाबासाहेब अडसुरे, दिलीप भालेराव, सुनील भालेराव, छबु भालेराव, तात्याराम मगर, भाऊसाहेब ढगे, लक्ष्मण ढगे, गोरक्षनाथ अडसुरे, बेल्हेकर मेजर, पळसकर पाटील, संजुभाऊ अडसुरे, सुनिल ताकटे, गायके पाटील, अर्जुनभाऊ मरकड, डॉ. रामनाथ ढगे, बाबासाहेब ढगे, सुरेश ढगे, सुनील ढगे, अडसुरे, प्रकाश ढगे, कैलास ढगे, संतोष ढगे, गणपत अडसुरे, राजू (गवजी) ढगे, कु-हे पाटील, पाटोळे पाटील, बन्सी ढगे, भाऊसाहेब भोर, झावरे पाटील, विद्यापीठ हौसिंग सोसायटी, बापू डव्हान, खळेकर पाटील, अरीफभाई शेख, डॉ. खरे, तसेच खडी क्रॅशर युनिट चे सर्व स्टाफ, खडांबे गावचे सरपंच कैलास पवार, मा. सरपंच व प्रगतशील शेतकरी सुरसिंगराव पवार यांनी रस्ता खुला करून देण्यास सहकार्य केल्याबद्दल त्यांचे देखील सर्व ग्रामस्थ आणि वरवंडी ग्रामपंचायत तर्फे आभार व्यक्त केले. गावचे जेसीबी फिरोज शेख आणि बाळूभाऊ अडसुरे यांनी देखील गावच्या कामासाठी तत्परतेने जेसीबी उपलब्द्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त केले.

प्रभारी चार्ज असून देखील सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करणारे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी पाखरे भाऊसाहेब यांचे तसेच रस्ता खुला करण्याचे काम सुरू असताना दुचाकीवर फेरफटका मारून रस्त्याच्या कामाची पाहणी करून प्रशंसा करणारे तसेच सदर रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देणारे जिल्हापरिषद सदस्य धनुराज गाडे पाटील यांचे देखील आभार व्यक्त केले. शेवटी वरवंडी गावावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करणारे, गावची प्रत्येक अडचण दूर करणारे, गावचे लाडके नेतृत्व ना. प्राजक्त तनपुरे यांचे देखील आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या