घरफोडीतील गुन्हेगारांकडून 28 तोळे सोनं हस्तगत; लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर पोलिसांची कारवाई

अहमदनगर/ जावेद शेख : पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता व सहआयुक्त पुणे शहर डॉ. रविंद्र शिसवे यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे तसेच शरीर व मालाविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन करणे याबाबत पुणे शहरातील पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.

लोणी काळभोर पोलिस ठाणे कडील तपासातील पथकातील अंमलदार पो.ना साळुंके, निखिल पवार असे कदमवाक वस्ती लोणी काळभोर परिसरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, दोन इसम संशयास्पदरीत्या लोणी स्टेशन परिसरात मोटार सायकल वरून फिरत आहेत. मिळालेल्या माहितीवरून पो.ना अमित साळुंखे यांनी तपास पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना कळविले असता त्यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना दिली असता त्यांनी तपास पथकातील इतर अंमलदार यांना घेऊन पुढील कार्यवाही बाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे नमूद तपास पथक लोणी पोलीस स्टेशन येथे सापळा रचून थांबले असताना दोन संशयित इसम मोटार सायकल वरून लोणी पोलीस स्टेशन परिसरात फिरत असताना दिसले. त्यांना तपास पथकाने थांबण्याचा इशारा दिला असता सदरचे संशयित तेथे त्यांची मोटर सायकल न थांबवता पोलिसांना चकवा देत भरधाव वेगाने पुढे निघून गेले असता तपास पथकाने मोठ्या शिताफीने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून त्यांचे नाव व पत्ता विचारले याबाबत माहिती घेतली.

आरोपी नंबर 1) राजू कुंडलीक मेत्रे वय 26 रा के/ ऑफ लडकत, माळी मळा, लोणी काळभोर, हवेली पुणे, मुळगाव शिवाजीनगर, निलंगा लातूर आरोपी नंबर 2) दस्तगीर बासू शेख वय 29 राके/ऑफ लडकत माळीमळा लोणी काळभोर हवेली पुणे अशी असल्याचे सांगितलेे. त्यांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्यांनी लोणी काळभोर पोलिस ठाणे कडील 1)गु.र.नं 523/2021 भा.द.वि.क 457/380 2)650/2021 भा.द.वि कलम 454, 457,380 3)गु.र.नं 604/2021भा. द.वि.कलम 380 4)गु.र.नं585/2021 भा.द.वि कलम 380, 5) गु.र.नं.481/2021भा द वि कलम 534/2021 भा.द.वि कलम 457, 380
6) गु.र.नं.506/21भा.द.वि 457 380 
7)गु र नं. 481/2021भा द वि कलम 454, 380 
8)गु र नं.409/21भा.द.वि. कलम 457, 380 
9) गु र नं.82/21भा द वि कलम 82/21भा द वि कलम 392, 34 
10)गु र नं.539 भा द वि कलम 392,34 
असे एकूण 10 गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले असून आरोपी यास अटक करून अधिक तपास केला असता नमूद उन्हाळ्यामध्ये आरोपीकडून गेल्या माला पैकी 14,00,000/- रुपये किमतीचे 28 तोळे सोन्याचे दागिने व एक मोटर सायकल एकूण 14 लाख 50 हजार रुपये चा माल हस्तगत करून जप्त करण्यात आलेला आहे. यातील आरोपी क्रमांक 1) राजू मेत्रे हा लातूर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यास यापूर्वी देखील गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर, डॉ रविंद्र शिसवे सह आयुक्त पुणे शहर, नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, नम्रता पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ 05, बजरंग देसाई पोलीस आयुक्त हडपसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र मोकाशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणी काळभोर पोलीस ठाणे तसेच लोणी काळभोर पोलीस ठाणे कडील तपास पथकातील अधिकारी राजू महानोर सहायक पोलिस निरीक्षक यांचे सोबत, पो ह.वा. नितीन गायकवाड, सुनील शिंदे, पो.ना अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, संभाजी देविकर, पो.शी राजेश दराडे, दिगंबर साळुंखेे, बाजीराव वीर, निखिल पवार, शैलेश कुदळे यांचे पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या