वांबोरी चारी टप्पा 2 कामाच्या निविदा प्रक्रिया राबविण्यास परवानगी- ना. तनपुरे

राहुरी शहर/अशोक मंडलिक : दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या वांबोरी चारी टप्पा 2 कामाच्या निविदा प्रक्रिया राबविण्यास परवानगी मिळाली असल्याची माहिती नगर विकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज दिली.

अधिक माहिती देताना मंत्री तनपुरे यांनी सांगितले की वांबोरी चारी टप्पा दोन कामास लवकरच परवानगी आणण्याचे आश्वासन दिलेले होते. त्यानुसार विविध बैठका व येणाऱ्या अडचणींवर विचारविनिमय करून मार्ग काढण्यात आला होता. अखेर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत चारी टप्पा दोन च्या कामास निविदा प्रक्रिया राबविण्यास अखेर परवानगी मिळाली. त्यामुळे पुढील कार्यवाही होण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.

मुळा धरण ते मजलेचिंचोली पर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी अंदाजे 54 कोटी रुपये खर्च येणार आहे. तत्पूर्वी लागणारी सर्व परवानगी मिळविण्यात येणार आहे. टप्पा दोनचा महत्त्वाचा समजला जाणारा निविदा प्रक्रिया परवानगीचा अडथळा आता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्या अनेक वर्षांपासून टप्पा 2 चा मार्ग कधी खुला होणार याकडे दुष्काळी भागातील जिरायत शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले होते.

यासाठी जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन काम मार्गी लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. यामुळे जिरायत भागातील लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या