पुणे : पुणे येथे "शुरा आम्ही वंदिले" या कार्यक्रमा अंतर्गत भारतीय सैन्यदलासह पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
सन्मान-गौरव सोहळया प्रसंगी विविध क्षेत्रातील अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी सैनिक अधिकारी, सैनिक फेडरेशनचे उपाध्यक्ष शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा ही गौरव करण्यात आला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कृष्णचंद्र सिसोदिया, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, चिंचवड महापौर सौ. उषामाई ढोरे, सैनिक फेडरेशन अध्यक्ष खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, पोलीस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन भाऊ चिंचवडे, सैनिक फेडरेशन कार्याध्यक्ष नारायण अंकुशे, उद्योग विंगचे अध्यक्ष समाधान निकम, फेडरेशनचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अनिल सातव, पुणे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव, संघटक संपत दिघे, तुकाराम डफळ, प्रवक्ते चंद्रहार पाटील आदिसह असंख्य बंधु भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पोलिस वेलफेर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन भाऊ चिंचवडे यांनी तर नियोजन व सूत्रसंचालन अन्य पदाधिकारी यांनी केले.
0 टिप्पण्या