सरस्वती भुवन प्रशालेत संविधान दिन उत्साहात साजरा


विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ, माजी मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी, ज्ञानेश्वर चाटुपळे, वैशाली लोंढे व्यासपीठावर उपस्थित होते.

        सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांनी सर्वांनी कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून काम करावे असे आवाहन केले.      

        याप्रसंगी ज्ञानेश्वर चाटुपळे, माजी मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी, उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विजय गव्हाळे, गौरी धर्में, वैष्णवी ठाणगे, स्नेहल फासाटे, ईश्वरी चाटुपळे ,वेदिका खाडे, अक्षरा अंबिलवादे, स्मिता हाडे, किर्ती मुळे या विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त सविस्तर माहिती देणारी भाषणे केली.

     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली लोंढे यांनी तर सूत्रसंचालन स्नेहल फासाटे, वेदिका खाडे यांनी केले. आभार दानिश शेख मानले. कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या