खुडसरगांव येथील श्री कालभैरव मंदिर भुमिपुजन संपन्न

आरडगांव/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी तिरी वसलेले खुडसरगांव येथील श्री कालभैरव मंदिर भुमिपुजन व जन्माष्टमी निमित्त स्वयंभू मूर्ती (तांदळा) अभिषेक व जन्मोत्सव सोहळा शनिवार दि २७ नोव्हेंबर २०२१ रोजी ह.भ.प. भागवताचार्य स्वामी श्यामसुंदरजी महाराज पुरी यांच्या शुभहस्ते मंदिर भूमिपूजन संपन्न झाले.

सकाळी ६ वाजता श्री कालभैरव स्वयंभू मूर्ती (तांदळा) अभिषेक तसेच जन्मोत्सवा निमित्त दुपारी ४ ते ६ ह.भ.प.भागवताचार्य स्वामी श्यामसुंदरजी महाराज पुरी यांचे किर्तन व महाप्रसादानी कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास खुडसरगांव सह पंचक्रोशीतील भाविक भक्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या