अज्ञात वाहनाच्या हुलकावणीने दुचाकी घसरून दोनजण गंभीर जखमी


विलास लाटे/पैठण : औरंगाबाद पैठण मुख्य रस्त्यावर ढोरकीन येथील औरंगाबाद महानगर पालिकेच्या पंपहाऊस बुस्टर पासून काही अंतरावर दुचाकीवरुन जात असताना अज्ञात वाहनाने हुलकावनी दिल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार,२८ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. मुस्तफा मुबारक अंसारी व इम्रान युसुफ पठाण (दोघेही रा. मालेगाव) असे गंभीर जखमींची नावे आहेत.

मुस्तफा अंसारी व इम्रान पठाण हे दोघे दुचाकी (क्र. एम. एच. ०५ : ईएस. ३३२४ ) वरून मालेगावहून बिडच्या दिशेने जात असताना पैठण औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील ढोरकीन येथील महानगर पालिकेच्या पंपहाऊस बुस्टरपासून हाकेच्या अंतरावर अज्ञात वाहनाने हूलकावनी दिल्याने दुचाकीरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून घडलेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी जमलेल्या जमावातून १०८ रुग्णवाहिकेला फोन करून पाचारण करण्यात आले. माहीती मिळताच ढोरकीन येथील आपत्कालीन सेवा विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेश घोडके, रुग्णवाहिका चालक लतिफ शेख हे त्वरीत घटनास्थळी दाखल होत डॉ. घोडके यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करत, पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या