साकुरी हद्दीत ५ एकर ऊस जळून खाक

अहमदनगर/ जावेद शेख : तालुक्यातील साकुरी हद्दीत ५ एकर ऊस जळून खाक झाला असून महावितरणच्या गलथान कारभारामुळे सदरील ऊस जळाल्याचे बोलले जात आहे. 

महेश रोहम हे काही महिन्यांपुर्वी कोरोना आजाराने निधन पावले असल्याचे कळते, त्यांच्या परिवारावर पुन्हा दुसऱ्या संकटाने झडप घातली आहे, एका दुःखातून सावरत नाही तोच दुसरेही दुःख समोर उभे राहिल्याने मोठ्या संकटांना सामोरे जाण्याची त्यांच्या परिवारावर ही दुसरी वेळ आहे.

महावितरण विज कंपनीचा गलथान कारभार तथा लोंबकळनाऱ्या विद्यूत तारा या ऊस जळीत प्रकरणास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. रोहम परिवाराच्या जळालेल्या ऊसाचा त्वरित पंचनामा करुन लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी साकुरी, राहाता परीसरात शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.

आग विझवण्यासाठी श्रीसाईबाबा संस्थान आणि नगरपंचायत शिर्डी तसेच प्रवरा व गणेश सहकारी कारखाना तसेच राहाता नगरपरिषदेचे अग्निशामक जवान जिवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न करत होते. परंतु आग आटोक्याबाहेर गेल्यामुळे संपुर्ण ऊस जळुन काही क्षणात खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या