राहुरी शहर / अशोक मंडलिक : तालुक्यातील वांबोरी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची १३१ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्त्री शिक्षणाने अवघा समाज शिक्षित होवून अंधश्रध्देपासून दूर राहून अधूनिकतेची कास धरेल. त्यातून कुटुंब सुधारतील व त्यांचा सर्वांगीण विकास होईल या उद्देशाने महात्मा फुले यांनी महिलांसाठी पुण्यात पहिली शाळा काढून महिला साक्षरतेला प्रोत्साहन दिले असल्याचे प्रतिपादन संत सावता माळी युवक संघाचे सोशल मीडिया प्रमुख दिपक साखरे यांनी केले.
वांबोरी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास वांबोरी शहराध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब सत्रे, बाळासाहेब साखरे, मनोज देशमाने, कमलेश सत्रे, सोमनाथ कुऱ्हे, गणेश मिरीकर, ओम साखरे आदिसह बहुसंख्य फुले प्रेमी उपस्थित होते.
0 टिप्पण्या