अतिदक्षता

रस्ता नाही आहे जणू मृत्यूचा सापळा...!
नागरिकांच्या हाती आश्वासनांचाच भोपळा...!!
संपूर्ण रस्त्यांवर जणू खड्याचा विळखा...!
अपघातांचे परिणाम मात्र वेळेतच ओळखा...!!
प्रसारमाध्यमांवर चर्चा आहे नेहमीच खास...!
कुणीही होईना या कठीण परीक्षेत पास...!!
केला नसेल आंदोलनासाठी कोणी घोळका...!
आता किती दिवस दाखवायचा जनतेने पुळका...!! 
प्रशासनानेही झटकले असतील जरी हात...!
अपघातांमुळे होऊ नयेत कुणाचाही घात...!!
संबंधित विभागाचे अनेकदा टोचले कान...!
आता उरला फक्त बांगड्यांचाच मान...!!
सर्वसामान्यांनी किती दिवस खायच्या खस्ता...!
ओळखा बघू कोणता असेल हा रस्ता...!!
 
बाळासाहेब भोर
अ. भा. क्रांतिसेना, संगमनेर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या