राहुरी खुर्द पोटनिवडणूकित मोठी रस्सीखेच

राहुरी शहर/अशोक मंडलिक : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिक्षय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राहुरी खुर्द ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातुन कार्यक्रम जाहीर झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या निर्मलाताई मालपाणी यांचे दुःखद निधन झाल्यामुळे या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. गावातील दोन्ही मंडळांनी उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. निवडणूक होऊन फक्त ८ महिने झाल्यामुळे अजुन बराच कालावधी जायचा असुन त्यामुळे दोन्ही मंडाळात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

एकास एक उमेदवार देण्यासाठी दोन्ही मंडळाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. त्यातील जनसेवा मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे शब्बीरभाई देशमुख यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकिमध्ये स्वर्गीय निर्मलाताई मालपाणी यांच्या कुटुंबातील उमेदवार देण्याचे एकमताने ठरले आहे. तर गावातील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे की निवडणूक घेण्यापेक्षा हि जागा  बिनविरोध करून गावची एकी दाखवावी तर दुसऱ्या मंडळाच्या बैठकीकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या