राहुरी शहर/अशोक मंडलिक : जगाच्या वेगवान स्पर्धेत मराठा समाज हा मागे पडत असून समाजातील दुर्बलांच्या मार्गदर्शनासाठी मराठा ज्ञानवंतांनी आपला सहभाग वाढवला पाहिजे. विविध क्षेत्रात होणाऱ्या वेगवान बदलाला सामोरे जाण्यासाठी मराठा संघटनांनी आपले व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रभारी अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे यांनी केले.
संगमनेर येथील विश्रामगृहावर नाशिक येथील कार्यक्रमासाठी जात असताना कोंढरे थांबले असता राष्ट्रीय प्रभारी अध्यक्षपदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, संयुक्त चिटणीस प्रमोद जाधव, राष्ट्रीय युवक प्रतिनिधी अतिष गायकवाड आदी उपस्थित होते. उत्तर नगर जिल्हाध्यक्ष लालूशेठ दळवी व दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजीराव डौले यांच्या हस्ते राजेंद्र कोंढरे यांचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. कोंढरे बोलताना पुढे म्हणाले की, अखिल भारतीय मराठा महासंघ हि मराठा समाजाची सर्वात जुनी संघटना असून मराठा आरक्षणसाठी अण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले असून संघटनेसाठीं अनेकांचे योगदान आहे. मराठा आरक्षणासाठी महासंघाचा मोलाचा वाटा असून पुन्हा आरक्षणसाठी लढा उभारावा लागणार आहे. सारथी संस्थेचे माध्यमातून अनेक अधिकारी मराठा समाजातून तयार होत आहे. मराठा महासंघ आता अखिल भारतीय करायचा असून दिल्ली, गुजरात, कर्नाटक, गोवा, हरियाणा, राजस्थान आदी राज्यात संघटना उभी केली जाणार आहे.
नगर जिल्ह्यात मराठा महासंघाची व्यापक बांधणी करून त्या पद्धतीची जागृती करण्यासाठी पुढचं पाऊल या पुस्तिकेच्या माध्यमातून महासंघ संपर्क अभियान करेल 'पुढचे पाऊल' हे मराठा समाजबांधवांना एक मार्गदर्शक पुस्तक आहे. त्याचा उपयोग जीवनात करता येईल. जन्मापासून मृत्यूपर्यंत यात माहिती असून समाजाचा उत्कर्ष व्हावा यासाठी हा प्रयास आहे. असेही श्री. कोंढरे यांनी सांगितले आहे.
यावेळी सर्व मराठा युवकांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व 'पुढचे पाऊल' हे पुस्तक देण्यात आले. सोशल मीडिया वर मराठा महासंघ चे कुटूंब अँप बनवून एक लाखाच्या पेक्षा जास्त सभासद देशभरातून जोडले बद्दल भाऊसाहेब वाकचौरे व ओम काळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक सचिव रमेश बोरुडे यांनी सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी केले. आभार युवक जिल्हाध्यक्ष ओम काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी अकोलेचे अध्यक्ष भानुदास गायकर, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण डांगे, संगमनेरचे प्रदिप हासे, राहुरी शहर अध्यक्ष प्रदिप भुजाडी, पाथर्डी चे रोहिदास धनवडे यांनी प्रयत्न केले. यावेळी फटाक्यांच्या अतिषबाजीत नूतन राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनचे स्वागत करण्यात आले.
0 टिप्पण्या