श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : ॲड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानच्या विद्यानिकेतन ॲकेडमीतील कु.प्राजक्ता दिपक चव्हाण हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २९८ पैकी २६८ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले व विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
प्राजक्ताने संपादित केलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, संस्थेच्या उप अध्यक्षा शशिकलाताई शिंदे, संस्थेचे चेअरमन टी.ई.शळके, व्हा. चेअरपर्सन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, एस.व्ही.सुकळे, विजयराव बनकर, प्रकाश निकमपाटील, ॲड.भागचंद चुडीवाल, संजयभाई शाह, श्रीमती मंगलाताई आढाव, डॉ.अर्चना शेळके तसेच विद्यालयाच्या प्राचार्या सौ.रंजना जरे, समन्वयक अमित त्रिभूवन, सर्व शिक्षिक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.
0 टिप्पण्या