सामाजिक गरजा ओळखून तरुणांनी व्यावसायभिमुख व्हावे - उद्योजक दिलिप जगताप

राहुरी / बाळकृष्ण भोसले : व्यावसायिक शिक्षणाच्या संधी आज सर्वत्र उपलब्ध आहेत. छोटेछोटे कुटिर उद्योग कमी भांडवल व अल्प मनुष्यबळात सहजरीत्या करणे सोपे आहे. त्यासाठी बाजारातील सामाजिक गरजा ओळखून तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायभिमुख होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जगताप उद्योग समुहाचे संस्थापक दिलिप जगताप यांनी केले.

तालुक्यातील चिंचोली येथील राजेंद्र भोसले यांच्या सुप्रिम मेन्स वेअर या दालनाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी सरपंच गणेश हारदे, ज्येष्ठ नेते जालिंदर काळे, उपसरपंच विलास लाटे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब लाटे, स्कुल कमेटी अध्यक्ष गणेश लाटे, भाऊसाहेब ब्राम्हणे उपस्थित होते.

जगताप पुढे म्हणाले व्यवसाय कोणताही करा त्यासाठी सचोटी, जिद्द व प्रामाणिकतेची जोड आवश्यक असते. राजेंद्र भोसले या तरुणाने गेली २५ वर्षापासून कपडे शिवण्याचे तंत्र आत्मसात करुन ते जपले व वाढविले अत्याधुनिक मशीन त्याने घेऊन काळाबरोबर स्पर्धेत टिकण्याचे सामर्थ्य अंगिकारल्याने तो आज टिकून आहे. सरकारी नोकऱ्यासाठी वेळ वाया घालण्यापेक्षा व्यावसायिक, तांत्रिक शिक्षणावर तरुणांनी भर देण्याची गरज असून बाजारात कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते वेळीच ओळखून त्या निर्मितीसाठी प्रयत्न केल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी उद्योजक झाल्याशिवाय राहणार नसल्याचे ते शेवटी म्हणाले.

प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शरद आरगडे, भाऊसाहेब भोसले, कैलास ब्राम्हणे, भास्कर लाटे, शिवाजी राऊत, मधुकर त्रिभुवन, दिलिप दाढकर, नाना पवने, विशाल राका, वसंत कातोरे, रामु भोसले, राजु भोसले, संजय लाटे, प्रकाश लाटे, अनूप भोसले, साहेबराव थोरात आदिंसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या