तोंडोळी बलात्कार प्रकरणातील तिघांचे डीएनए अहवाल पाॅझिटिव

दरोडेखोरांवर मोक्का कायद्यातंर्गत कारवाई

विलास लाटे /पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरातील तोंडोळी येथील दि.१९ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान तोंडोळी शिवारातील शेत वस्तीवर दरोडा टाकुन महिलांवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त झाला होता. या घटनेतील सातही दरोडेखोरांवर मोक्का कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा वैद्यकीय चाचणीचा अहवाल नुकताच हाती आला असुन त्यापैकी तीघांच्या डीएनए चाचणी अहवाल पाॅझिटिव असल्याची माहीती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.

कुख्यात गुन्हेगार प्रभु शामराव पवार याच्या टोळीने दरोडा टाकुन दोन महिलांवार सामुहिक आत्याचार केला होता. या घटनेनंतर पोलीसांनी तपासचक्रे फिरवत सातही जनांच्या मुसक्या आवळल्या. त्यातील चौघांनी चिकलठाणा येथे लुटमार केल्याचे समोर आले होते. त्यांना चिकलठाणा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. यातील प्रभु पवार, विजय जाधव, सोमीनाथ जाधव, ज्ञानेश्वर जाधव अशा चौघांची नुकतीच हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मोक्का कायद्यामुळे पोलीसांना तपासणीसाठी वाढीव अवधी मिळाला आहे. बलात्काराच्या घटनेनंतर अटकेतील सातही जनांची वैद्यकीय तपासनी करण्यात आली असुन या तपासनीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. त्यात तिघांनी बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या