जिल्ह्यातील 192 ग्रामपंचायतीच्या 274 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर

राहुरी शहर/अशोक मंडलिक : निधन, राजीनामा, अपात्रता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी राज्यातील 4554 ग्रामपंचायतीमधील 7130 रिक्त जागांच्या पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील 192 ग्रामपंचायती मधील 274 रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूकांचे सर्व जिल्हाधिकार्‍यांना सूचना देणारे परिपत्रक नगरचे उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना पाठविले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार तारीख निहाय निवडणूक कार्यक्रम घेण्यात यावा. अशा सूचना या परिपत्रकांत देण्यात आल्या आहेत. या निवडणूकांसाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 9 डिसेंबर 2021 उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या