विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन येथे पोषण अभियानांतर्गत येथील पोलिस काॅलनीतील अंगणवाडीत पूरक पोषण आहार, कुपोषित बालकांच्या संगोपनासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख तथा सरपंच प्रतिनिधी मनोज पाटील पेरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
दरम्यान या अभियानात गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरी मुली, अंगणवाडी मध्ये शिक्षण घेत असलेल्या बालकांना सुदृढ आहारा विषयी व आरोग्य विषयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच शासनाने बालकांसाठी सुरू केलेल्या सोयी सुविधांचा लाभ घेण्याचे आव्हान देखील करण्यात आले. याप्रसंगी अंगणवाडीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रमेश शिंदे, युवा सेना तालुका प्रमुख विकास पाटील गोर्डे, ग्रामपंचायत सदस्य अमोल वंजारे, सुजित जाधव, अमोल कोथिंबीरे, गणेश काळे, भाऊसाहेब कोथिंबिरे, नंदू तळेकर, भरत मोघे सह अंगणवाडी सेविका, मदतनीस व पोलीस कॉलनीतील महिला उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या