तहसीलच्या आवारात मोर्चा, आंदोलन करण्यासाठी जागेची मागणी- कोकाटे

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेखतहसीलच्या आवारात मोर्चा, आंदोलने करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने राहुरीचे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.या संदर्भातील लेखी निवेदन राहुरी तहसीलचे नायब तहसीलदार दुशिंग यांनी स्वीकारले. लेखी निवेदन देण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे संदीप कोकाटे, रोहित तेलतुंबडे, सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश वाघ, राजू दाभाडे, विजय भोसले, वंचित बहुजन आघाडीचे आनिल जाधव आदी उपस्थित होते. लोकशाहीमध्ये लोकांना आपले मत व्यक्त करण्यासाठी आणि निषेध नोंदविण्याचे अधिकार अंमलबजावणीसाठी तहसिल कार्यालयाच्या आवारात जागा उपलब्ध करून द्यावी.

भारत देश हा भारतीय संविधानिक मार्गाने लोकशाही पद्धतीने कृतीशील काम करत आहे. आपण आपल्या राहुरी तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी प्रशासन म्हणून काम करत आहेत. राहुरी तालुक्यातील बराच भाग दुर्गम आदिवासी, वंचित बहुजन, दुष्काळी म्हणून ओळखला जातो. परिणामी प्रशासनाने कितीजरी प्रयत्न केले तरी विकासाचे योग्य नियोजन करण्यात जनतेचा सहभाग नोंदला जात नाही. जनतेसाठी बनवलेल्या योजना जनते पर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे मुलभूत हक्क अधिकार यासाठी नेहमी प्रशासनाकडे संविधानिक व शांततेच्या मार्गाने जनतेला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी मोर्चे, आंदोलने, उपोषण आपल्या कार्यालयाच्या आवारात करण्यासाठी आपल्या तहसिल कार्यालयाच्या आवारात जागा उपलब्ध होणे हा जनतेचा संवैधानिक आधिकार आहे. अशी जागा मिळावी असा आमचा आग्रह आहे. ही जागा तहसील कार्यालयाच्या आवारात असावी. त्या जागेवर सर्व नागरी सुविधा असाव्यात. उदा. पिण्याचे पाणी, वीज, संडास-बाथरूम उपलब्ध असावेत. जनता आणि प्रशासन यांनी एकत्रित काम करुन संविधानाच्या आधारे जनतेच्या विकासासाठी हे आवश्यक आहे. तरी या निवेदनाची योग्य दखल घ्यावी अन्यथा आपल्या कार्यालयावर लोकशाहीहक्कासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. तसे करावे लागू नये, यांची आपण दक्षता घ्याल ही आपेक्षा श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

                                       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या