महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याचे कीर्तनाने हरीबाबा पुण्यतिथी सोहळा संपन्न

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : हरीबाबा एक साधू होते. साधू ज्या ठिकाणी वास्तव्य करतात तेथे त्यांची पूजा असते. अंत:करणात जो भाव असतो तो त्या ठिकाणी महत्वाचा असतो.काल्याचे कीर्तन म्हटले की श्रीकृष्णाचे जीवन चरित्र असते. श्रीकृष्ण भगवान हे लहान बालक असताना पुतना हिने त्याला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला तिच्याकडे मातृभाव व शत्रुभाव होते. पण श्रीकृष्णाने तिला ठार मारले. तिचा उद्धार केला. दु:खरुपी विष प्याल्याशिवाय सुखरूपी सुख मिळत नसते. श्रीकृष्ण भगवान यांनी गौकुळवासीयांवर खूप प्रेम केले. श्रीकृष्णाच्या अनेक लीला व जीवनावर महिमा महंत रामगिरी महाराज मठांधीपती सरला बेट यांनी शिरसगाव येथे हरीबाबा पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी वर्णन केले.

श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे ब्रम्हलीन श्री समर्थ सद्गुरू बालसन्यासी श्री ह,भ.प.हरीबाबा यांचा ३२ वा पुण्यतिथी सोहळा कोरोनाचे शासकीय नियम पाळून दिनांक १६ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर पर्यंत साजरा करण्यात आला. शिवलीलामृत गंथ पारायण, हरिपाठ, रात्री ९ वा हरी कीर्तन, ग्रंथ व्यासपीठ दिनकर यादव व ह.भ.प.मीनाताई महाराज भांड, ह.भ.प.वैशाली बाबासाहेब कदम, ह.भ.प.अंजली बाळासाहेब यादव, ह.भ.प.बाळासाहेब महाराज रंजाळेमहाराज यांचे हरिकीर्तन, रविवारी समाधी व मूर्तीची विधियुक्त अभिषेक, पूजा, दुपारी ४ वा. मूर्ती व ग्रंथ मिरवणूक, रात्री ९ वा. ह.भ.प.दादासाहेब रंजाळेमहाराज यांचे हरिकीर्तन व सोमवारी ह.भ.प.महंत श्री रामगिरी महाराज मठाधिपती सरला बेट यांचे सकाळी काल्याचे कीर्तन झाले व महाप्रसादाचा कार्यक्रम संपंन्न झाला.
१९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पोर्णिमा निमित्त संगीत भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गणेशराव मुद्गुले यांनी व श्री हनुमान मंदिर श्री विठ्ठल मंदिर, श्री महादेव मंदिर ट्रस्ट अध्यक्ष फकीरचंद बकाल, उपाध्यक्ष जयराम पवार व सचिव, सर्व पदाधिकारी शिरसगाव, भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ शिरसगाव वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या