भव्य घरगुती गणेश उत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन

राहुरी प्रतिनिधी : राहुरी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरामध्ये भव्य घरगुती गणेश उत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन केले असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रतिक विधाते यांनी केले.

या स्पर्धेमध्ये विजेत्यांना आकर्षक  भेटवस्तू आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना राहुरी शहर मनसे कडून प्रमाणपत्र देण्यात येईल. दि.१० सप्टेंबर ते १२ सप्टेंबर रोजी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांच्या सजावटीचे परीक्षण करून त्याचे गुणांकन करण्यात येईल व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल. स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी मो.नं. ९६२३२६२७६७  या व्हॉट्सअप्प  नंबर वर बाप्पा सोबतचा सेल्फी व नाव नंबर पाठवावा.

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून कुठलीही यात्रा , सण व इतर कार्यक्रमावर निर्बंध होते. तसेच निर्बंध सार्वजनिक गणेश उत्सवाच्या आयोजनावर सुद्धा आले होते. मात्र आता गणेश भक्तांसाठी या स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे भक्तांच्या आनंदात भर पडणार आहे. यावर्षी घरातील गणेश उत्सव सजावटीला चांगले प्रोत्साहन देण्याचा निर्णय शहर मनसेने घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या