निषेध म्हणून अखिल भारतीय क्रांतिसेनेचे अनोखे आंदोलन
राज्यात २० दिवस उलटून सुद्धा कोणत्याही पक्षाची सत्ता स्थापन झालेली नाही.राष्ट्रपती राजवटीच्या दृष्टीने राज्याची वाटचाल सुरू आहे.राज्यामधील हा राजकीय तमाशा शेतकरी सर्व सामान्य नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.शेतकरी मरणासन्न झालाय पण राज्यात कोणालाही सोयरसुतक नाही म्हणून या सगळ्यांनाचा निषेध म्हणून अखिल भारतीय क्रांतिसेना व मित्र पक्षांच्या वतीने आज दि.१२ नोव्हेंबर मंगळवार रोजी अनोखे प्रतिकात्मक सरकार स्थापन आंदोलन करून मंत्री मंडळाने शपथ घेतली व सरकारी हिताचे निर्णय तातडीने घेऊन सदरील निर्णयांची अंमलबजावणी १२ नोव्हेंबर च्या मध्यरात्री पासून सर्व सरकारी कार्यालयात करण्यात यावी असे आदेश नवीन मंत्री मंडळाने काढले आहेत.व राज्यपाल महोदय यांना आम्हाला कारभार करू द्यावा म्हणून परवानगी मागण्यात येणार आहे. सर्व विभागीय आयुक्तांना व सर्व कार्यालयात ह्या मंत्रिमंडळाचे निर्णय लागू करण्यात येणार आहेत.
यावेळी छावा संघटनेचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक प्रा चंद्रकांत भराट यांनी सरकार स्थापनेला परवानगी दिली.
या प्रतिकात्मक शपथविधी वेळी पुढील मंत्र्यांनी शपथ घेतली.
नितीन प्रभाकरराव देशमुख -(प्रतिकात्मक मुख्यमंत्री)नगरविकास,अर्थ,सहकार
विधानसभा सभापती - शरद जाधव,गृहमंत्री- दिनेश दुधाट पाटील,औदुंबर देवडकर - क्रीडा मंत्री,भरत फुलारे-महिला व बालविकास पुरुष हक्क आयोग,अमोल काळे-ऊर्जा मंत्री,राजू शेरे-कामगार मंत्री,दीपक गायकवाड-पर्यटन मंत्री,मनोहर निकम- उत्पादन शुल्क मंत्री,आशिष वाघमारे- शालेय शिक्षण व उच्च शिक्षण,लक्ष्मण कदम- जलसंपदा ,संजय कोकाटे-कृषी मंत्री,शरद पवार-महसूल मंत्री,सविता शिंदे-ग्रामविकास मंत्री,प्रवीण साबळे-आरोग्य मंत्री,पदमनाभ कुलकर्णी-वनमंत्री,एकनाथ खरात-उद्योग मंत्री,
विधानसभा सभापती शरद जाधव यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली.
👍तसेच यावेळी शंकार गरुड ,गणेश जाधव ,सुनील शिंदे, किशोर गायकवाड ,गजानन खाडे, नक्की खवणे अमोल सोळंके अशोक सोळंके,सागर लाड,मयूर गोसावी इत्यादी प्रतिकात्मक आमदार उपस्थित होते.
👍या शपथविधी सोहळ्यानंतर तातडीने खुली मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली व राज्याच्या हिताच्या दृष्टीने पुढील निर्णय घेऊन अमलबजावणी करण्याचे ठरले.
प्रतिकात्मक मंत्रिमंडळ बैठक निर्णय
👍🏻अवकाळी पाऊस झाल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट एकरी 50,000 रुपये अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.
👍🏻मागील सरकारने केलेली तत्वतः कर्जमाफी च्या शासन निर्णयात बदल करून सदरील कर्ज माफी पूर्णतः करण्यात येईल व शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णतः कोरा करण्यात येईल.
👍🏻संपूर्ण राज्यात तातडीने दारूबंदी करण्यात येईल व तसेच दारूमुक्त गाव व शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव या घोषणेची अमलबजावणी करण्यात येईल.
👍🏻शेतकऱ्यांना मासिक निवृत्ती वेतन 10,000 देण्यात येईल.
👍🏻सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना सौर पंप मोफत देण्यात येतील.
👍🏻के जी टू पीजी शिक्षण मोफत देण्यात येईल तसेच शिक्षणाचे खाजगीकरण रोखण्यात येईल.
👍🏻सर्वाना समान शिक्षण व सर्वाना काम याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल.
👍🏻 लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येईल.
👍🏻पोलीस ड्युटी आठ तासांची करण्यात येईल तसेच प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला घर उपलब्ध करून देण्यात येईल.
👍🏻शासनातील सर्व खात्यातील जवळपास 4 लक्ष रिक्त जागा साठी तातडीने मेगा भरती घेण्यात येईल .
👍🏻राज्यातील सर्व बेरोजगारांना कायम नोकरी लगे पर्यंत 10,000 रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात येईल.
👍🏻शेतकरी विरोधी सर्व कायदे रद्द करण्यात येतील .
👍🏻जि एस टी रद्द करण्यात येईल.
👍🏻राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात येतील.
👍🏻सर्व वैधानिक विकास महामंडळाना तातडीने निधी वर्ग करण्यात येईल.व प्रादेशिक असमतोल दूर करण्यात येईल
👍🏻 प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 300 खाटांचे शासकीय रुग्णालय उभारण्यात येईल व औषधांच्या किमती संपूर्णपणे नियंत्रित करण्यात येतील.
👍🏻 सर्वाना घरे मिळण्यासाठी अमर्याद संपत्ती खरेदीवर नियंत्रण आणण्यात येईल.
👍🏻 राज्यातील सर्व राष्ट्रीय ,राज्य,जिल्हा,तालुका,मार्ग पक्के करण्यात येतील व सर्व टोल नाके आज मध्य रात्री पासून बंद करण्यात येतील .
👍🏻 असंघटित कंत्राटी कामगारांना कायम करण्यात येईल.
👍🏻 राज्यातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल.तसेच राज्यात जलदगती न्यायालय स्थापन करून प्रलंबित खटले निकाली काढण्यात येतील व लोखंसंख्येच्या प्रमाणात न्यायाधीशांची पदे भरण्यात येतील.
👍🏻 2005 नंतर रुजू सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल .
👍🏻 अनुदानास पात्र सर्व शिक्षकांना 100 % अनुदान देण्यात येईल .
👍🏻 एस टी महामंडळातील कामगार कर्मचाऱ्यांना तातडीने वेतन आयोग देण्यात येईल.
👍🏻 शेतकऱ्यांना अल्प दारात बी बियाणे खते उपलब्ध करून देण्यात येतील.
👍🏻 पत्रकार बांधवाना संरक्षण देण्यात येईल व त्यांच्या साठी वेतन आयोग गठीत करण्यात येईल तसेच पत्रकार महामंडळाची निर्मिती करण्यात येईल.
👍🏻 प्रतिकात्मक मंत्री मंडळातील सर्व प्रतिनिधी,आमदार कोणतेही निवृत्ती पेन्शन स्वीकारणार नाहीत.
👍🏻 भ्रष्टाचार करणाऱ्यास सेवेतून जागेवर बडतर्फ करण्यात येईल व त्याची संपत्ती शासन जमा करण्यात येईल ,त्याचे व कुटुंबियांचे सर्व शासकीय लाभ त्वरित बंद करण्यात येईल.
👍🏻 किमान वेतन हे 21000 करण्यात येईल.
👍🏻राज्यात पुरुष आयोगाची निर्मिती करण्यात येईल.
हे सर्व प्रतिकात्मक सरकार मधील निर्णय हे दिनांक 12 नोव्हेंबर 2019 च्या मध्यरात्री पासून लागू राहतील या निर्णयांची अंमलबजावणी करणे राज्यातील सर्व कार्यालयांना करणे बंधनकारक आहे.यात कोणताही बदल होणार नाही.या शासन निर्णयाची प्रति महितीस्तव सर्व कार्यालयांना पाठविण्यात येणार आहे.
1 टिप्पण्या
please contact me on my mobile number 9404365791 for this news coverage on Aakashwani Aurangabad.
उत्तर द्याहटवा