अखिल भारतीय क्रांतिसेनेची पैठण तालुका बैठक उत्साहात संपन्न


तालुक्यासह महाराष्ट्र मध्ये क्रांतिसेनेचा झंझावात निर्माण करणार- पक्ष प्रमुख संतोष तांबे पाटील.

गोरगरीब सर्वसामान्यांच्या प्रश्नावर क्रांतीसेना संघर्ष करणार - सरचिटणीस नितीन देशमुख.

पैठण/प्रतिनिधी : आज अखिल भारतीय क्रांती सेनेची पैठण तालुका बैठक पैठण शहरात पक्ष प्रमुख प्रा. संतोष तांबे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या बैठकीला शहर जिल्हा प्रमुख मनोहर निकम,जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ कसोळे पाटील,पैठण तालुका अध्यक्ष लक्ष्मण शेलार पाटील,औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष किशोर गोरे पाटील आदींची उपस्थिती होती.
        यावेळी बोलताना पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील म्हणाले की,पैठण तालुक्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून चळवळीत सक्रिय आहोत,समाजाच्या प्रश्नासाठी अनेक केसेस झाल्या आहेत,परंतु आता समाजकारणा सोबतच राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप केल्या शिवाय तालुक्याची बकाल अवस्था दूर होणार नाही,त्यामुळे आता पैठण सह संपूर्ण महाराष्ट्रात अखिल भारतीय क्रांतिसेनेचा झंझावात निर्माण करणार आहोत,तसेच यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अखिल भारतीय क्रांतिसेनेचे सरचिटणीस नितीन देशमुख म्हणाले की,पैठण तालुक्यात गाव तिथे क्रांतीसेनेची शाखा  स्थापन करून गोर गरीब आणि सर्व सामन्यांच्या प्रश्नावर संघर्ष करून ,तालुक्यात आक्रमक लढा उभारून प्रस्थापितांना गारद केल्या शिवाय क्रांतिसैनिक गप्प बसणार नाहीत.

          यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये पैठण तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण शेलार,युवक तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर गवांदे,बांधकाम कामगार आघाडी तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर सांगळे ,तालुका उपाध्यक्षपदी असलंम सय्यद ,संपर्क प्रमुखपदी जावेद सय्यद,विहामांडवा विद्यार्थी क्रांती सेना सर्कल प्रमुखपदी निखिल गांधले,व्यापारी आघाडी तालुका अध्यक्षपदी उभेदळ,पैठण शहर अध्यक्षपदी गणेश औटे,युवक क्रांतिसेना तालुका उपाध्यक्षपदी राम लघाणे,बांधकाम कामगार आघाडी पैठण शहर अध्यक्षपदी मोसीन शहा,पिंपळवाडी सर्कल प्रमुखपदी प्रवीण अडसरे,पिंपळवाडी उप सर्कल प्रमुखपदी शिवाजी जाधव,बांधकाम कामगार आघाडी पिंपळवाडी सर्कल प्रमुखपदी फिरोज शेख,आदी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
           या कार्यक्रमासाठी तालुक्यातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ कासोळे पाटील तर आभार प्रदर्शन लक्ष्मण शेलार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. संघर्ष आणि सातत्य या बळावर स्वराज्य निर्माण होते, आपक्याला तर फक्त उन्नती करायची आहे. शंभर टक्के यश येईल स्वतःवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवा! जय क्रांती

    उत्तर द्याहटवा
  2. हो. आपण नक्कीच यशस्वी होत आहोत.

    उत्तर द्याहटवा