अखिल भारतीय क्रांतीसेनेची औरंगाबाद मध्ये उत्साहात बैठक संपन्न


औरंगाबाद प्रतिनिधी : अखिल भारतीय क्रांतीसेना राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक राज्याध्यक्ष प्रा.संतोष तांबे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदापूरकर सभागृह ,यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ,औरंगाबाद येथे संपन्न झाली.जवळपास आठ तास चाललेल्या बैठकीमध्ये विविध ठराव संमत करण्यात आले.या बैठकीला औरंगाबाद, परभणी, नांदेड ,हिंगोली, धुळे, अहमदनगर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद, जळगाव, नंदुरबार येथील राज्य कमिटी सभासद उपस्थित होते.

        या बैठकीमध्ये,विभागवार कामाचा अहवालावर चर्चा करण्यात आली,तसेच नावात झालेल्या बदलाची प्राश्वभूमी बैठकीपुढे ठेवण्यात आली.लवकरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा ,तालुकास्तरीय  पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन ,नवीन नियुक्त्या व पक्ष बांधणीसाठी,गाव पातळीवरून सुरवात करण्याचे ठरले तसेच स्थानिक प्रश्नावर आंदोलने करण्याचे ठरले,येणाऱ्या विधानसभेमध्ये अखिल भारतीय क्रांतिसेनेचा झेंडा घेऊन संपूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याची इच्छा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली,क्रांती सेनेचा जाहीरनामा तयार करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली कमेटी तयार करून लवकरच जाहीर नामा प्रसिद्ध करण्याचे ठरले, प्रत्येक जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन उमेदवारी निश्चित करण्याचे ठरले,तसेच लवकरच राज्यस्तरीय महामेळावा घेऊन एल्गार करण्याचे ठरले.यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

        या बैठकीला प्रदेशअध्यक्ष प्रा.संतोष तांबे पाटील,प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख,अखिल भारतीय किसान क्रांती सेना राज्याध्यक्ष सुभाष चाटे,शिक्षक क्रांतिसेनेचे राज्याध्यक्ष भागचंद औताडे,प्रदेश संघटक शहाजी कोळपे,किसान क्रांती सेनेचे राज्य संघटक प्रतापसिंह पाटील,सल्लागार नवनाथ वाघ,अ.भा.क्रांती सेना मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले,किसान क्रांतिसेनेचे राज्य सरचिटणीस महेश शिंदे,अ.भा.क्रांतिसेना मराठवाडा संपर्क प्रमुख राजीव पवनकर,शिक्षक क्रांतिसेनेचे मराठवाडा संघटक मोहन सोनटक्के,किसान क्रांतिसेनेचे मराठवाडा अध्यक्ष कृष्णा सावंत,किसान क्रांतिसेनेचे राज्य कार्याध्यक्ष संदीप सोनवणे,किसान क्रांतिसेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष किरण म्हेत्रे, कार्यकारणी सदस्य अरुण थोरात,कचरू औताडे,रंगनाथ माने,इत्यादी उपस्थित होते.बैठकीचे अत्यंत योग्य आणि नेटके नियोजन करण्यासाठी जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ कासोळे,शहर जिल्हा अध्यक्ष मनोहर निकम ,जिल्हा संघटक राजू शेरे  यांनी विशेष परिश्रम घेतली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या