महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध क्रांतीसेना करणार टमरेल आंदोलन


औरंगाबाद शहरात स्वच्छतागृहांची निर्मिती न केल्यास महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध क्रांतीसेना करणार टमरेल आंदोलन

         औरंगाबाद शहर हे झपाट्याने वाढणारे औद्योगिक शहर आहे.पर्यटनाची राजधानी म्हणून शहर प्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध वेरूळ,अजिंठा लेणी,बेबीका मकबरा,पान,चक्की,म्हैसमाळ,पैठण इत्यादी पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी रोज हजारो नागरिक औरंगाबाद शहरात येत असतात.मराठवाड्याची राजधानी असल्याने दैनंदिन कामकाजासाठी सुद्धा मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील लोक,माता भगिनी या शहरात येत असतात, परंतु या शहरात उतरल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना,पर्यटकांना सार्वजनिक स्वच्छतागृहांची महत्वाच्या ठिकाणी कोठे ही सोय नाही.यामुळे सर्वसामान्यांची माता भगिनींची कुचंबणा होते, बाबा पेट्रोल पंप,क्रांती चौक,सिडको बस स्टँड,दर्गा चौक,मोंढा नाका, महानुभाव मंदिर चौक, हर्सूल टी पॉईंट,इत्यादी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता।गृहांची अत्यंत गरज आहे ,परंतु महानगर पालिका प्रशासन या विषयावर गंभीर व्हायला तयार नाही.या बाबत वारंवार प्रशासनाला विनंती करून ही ते लक्ष द्यायला तयार नाही, म्हणून क्रांतिसेनेच्या औरंगाबाद शहर शाखेच्या वतीने मा.महापौर व आयुक्त साहेब यांना निवेदन देऊन तातडीने वरील ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता गृहांची निर्मिती करावी असे सांगण्यात आले जर या बाबत प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास क्रांती सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वखाली टमरेल आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

        या शिष्टमंडळामध्ये क्रांतीसेनेचे शहर जिल्हा अध्यक्ष मनोहर निकम पाटील,संघटक राजू शेरे पाटील, सचिन शेळके,भाऊसाहेब आवारे,विध्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष वैभव पवार,किशोर गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. स्वछतागृह ही अति आवश्यक गरज आहे. मनपा ने तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे, नितीन भैय्या देशमुख, मनोहर निकम, राजू पा. शेरे, गायकवाड आदी सर्वांचे अभिनंदन! योग्य विषय, योग्य पद्धत

    उत्तर द्याहटवा