पाथर्डी : एकनाथवाडी येथील शहादेव मिसाळ यांची युवा क्रांती सेनेच्या पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी मिसाळ यांना दिले.
या निवडीनंतर क्रांती सेना महाराष्ट्र या पक्ष संघटनेचे अध्यक्ष मा. आ. शालिनीताई पाटील , प्रदेश अध्यक्ष मा. संतोष तांबे, प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे सर,शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष चाटे,प्रदेश संघटक शहाजी कोळपे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश शिंदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेडगे, द.नगर उपाध्यक्ष अविनाश कुरूमकर, कार्याध्यक्ष सुभाष दरेकर,उ.नगर उपाध्यक्ष अजित गुंजाळ, संदीप त्र्यंबके, उत्तर महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख अक्षय मांडगे, युवा क्रांती सेना अध्यक्ष शब्बीर शेख, उपाध्यक्ष शेखर पवार, सच्चिदानंद ढोले आदींनी अभिनंदन केले.
1 टिप्पण्या
Congrats bro
उत्तर द्याहटवा