लसीकरणासाठी क्रांतिसेनेचा आंदोलनाचा इशारा

राहुरी : एफ एम डी लसीकरण व लसीकरणास विलंब केलेल्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी क्रांतिसेनेने आज राहुरी तहसीलदार अनिल दौंडे यांच्याकडे केली .
       दर वर्षी एफ एम डी रोग प्रतिबंधक लस जनावरांना दिली जाते. परंतु चालू वर्ष उलटूनही जनावरांना लसीकरण करण्यात आलेले नाही. आता पर्यंत या लसीचे सहा वेळा निवेदा काढण्यात आल्या परंतु काही ना काही कारण करून या निवेदा फेटाळण्यात आल्या.एकीकडे गाई ला गोमाता म्हणा म्हणुन बळजबरी केली जाते आणि दुसरीकडे याचं मुक्या प्राण्यांना लसी साठी तरसावले जाते. जाणून बुजून लसीकरण करण्यासाठी या वर्षी विलंब करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र मधील बरेच जनावरे दगावले आहेत. यामुळे लसीकरणास विलंब करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व या लसी चा पुरवठा करण्यात यावा असे क्रांतिसेनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
     क्रांतिसेनेने जनावरें सोबत घेऊन कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा या निवेदनात दिला आहे.यावेळी क्रांतिसेनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदिप ओहोळ, जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेडगे ,युवक जिल्हा उपाध्यक्ष शेखर पवार,युवक जिल्हा सरचिटणीस गीतेश देवरे ,डिग्रस ग्रामपंचायत चे सरपंच पोपट बर्डे, योगेश भिंगारदे, संदीप पवार, राहुरी शहर अध्यक्ष संतोष मेहेत्रे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या