ठिबक सिंचन योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

मोहोळ : ठिबक सिंचन संचाचे तीन ते चार वर्षांपासून थकलेले अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे,अशा आशयाचे निवेदन कृषी अधिकारी सरडे यांना क्रांतीसेना शेतकरी सेलच्या वतीने आज देण्यात आले.
      ठिबक सिंचना खालील क्षेत्र वाढविण्यासाठी सरकारची आग्रही भूमिका आहे परंतु कृषी अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे मोहोळ तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना मागील तीन ते चार वर्षापूर्वी केलेल्या ठिबक सिंचनाचे शासकिय अनुदान अद्याप मिळालेले नाही.दुष्काळी परिस्थिती मुळे शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळ प्रसंगी बँका व खाजगी पतसंस्थेचे कर्ज काढुन आपल्या शेतात ठिबक सिंचन संच बसवले.परंतु तीन ते चार वर्षापासुन शासकीय अनुदानाचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला नाही.त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी व कृषी कार्यालयाचे चकरा मारुन हैराण झाले आहेत आणि बरेच शेतकरी या कारणामुळे गरज असुन ही नवीन ठिबक संच बसवण्यास टाळाटाळ करत आहेत.ठिबकचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.अन्यथा क्रांतीसेना शेतकरी सेलच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
     यावेळी क्रांतीसेना शेतकरी सेल चे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख महेश शिंदे,मोहोळ ता.कार्याध्यक्ष सुभाष बचुटे, लिंगेश्वर शिंदे,शहाजी पडवळकर, भास्कर थिटे आदी शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. शेतकर्‍यांना प्रत्येक सहाय्य वेळेवर मिळणे अत्यावश्यक आहे. तशा योजना कार्यान्वित व्हायला हव्या.

    उत्तर द्याहटवा