क्रांतीसेना शेतकरी आघाडीची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सोलापुर : क्रांतीसेना शेतकरी आघाडीची जिल्हा कार्यकारीणीची बैठक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शहाजी कोळपे ,पश्चिम  महाराष्ट्र संपर्क प्रमुख महेश शिंदे व जिल्हाध्यक्ष दिपकआबा पाटील यांच्या उपस्थीतीत पार पडली.
      सोलापुर येथील हाॅटेल सोना या ठिकाणी जिल्हा स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी सोलापुर जिल्हातुन  मोठ्या प्रमाणात युवा वर्ग व शेतकरी मित्र बांधव उपस्थित होते.
     शेतकरीवर्गाची अवस्था सध्या खुप दयनीय आहे, त्यामुळे कामगार वीमा प्रमाणे शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना  मोफत आरोग्यसेवा मिळण्यासाठी राज्य विमा महामंडळाची स्थापना करणेसाठी लढा उभारण्यात यावा ,तसेच सरसकट कर्जमाफी मिळावी, कृषीपंपाला मोफत व पुरेसा वीजपुरवठा मिळावा,शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा,स्वामीनाथन आयोग लागु करावा या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आघाडीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात यावा, असे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले व त्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी व सर्व तालुकातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात यावे , असे बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी शेतकरी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नवनियुक्तीचे पत्र आघीडीचे सरचिटणीस  शहाजी कोळपे , पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख महेश शिंदे व जिल्हा अध्यक्ष दिपकआबा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
    "प्रत्येक गांव,घर व शेतकरी,युवकांपर्यंत क्रांतीसेना"पोहोचुन शेतकरीहीताचे काम करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दीपकआबा पाटील यांनी यावेळी केले.शहाजी कोळपे व महेश शिंदे यांनी संघटनेची  माहीती व उद्देश संबधी उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना  मार्गदर्शन केले गेले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा व जिल्हाध्यक्षांचा सत्कार बोधराज भक्ती मंडळ व आदीशक्ती स्वामी समर्थ मंडळ बंकलगी व दक्षिण तालुक्याच्या वतीने सुनील देशमुख, सी टी पाटील सर यांनी केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोदबप्पा ताटे,जिल्हा संघटक प्रितमभाऊ जगदाळे,तसेच बार्शीचे देवडीकर,माळीसर, माढाचे किरण पवार,गौतम शिंदे,पंढरपुरचे सदाशिव शिंदे,मधुकर जमदाडे,दक्षिनचे सुनील पाटील,सोमनाथ कोळी,संतोष पवार, भारत खंडागळे ,बाळासाहेब देशमुख,मंगळवेढाचे दिपक बुडबुडे ,गणेश पाटील आदी पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या