- कृषि व संलग्नित महाविद्यालयाचा कृषी दिनानिमित्तचा नाविन्यपूर्ण उपक्रम स्तुत्य - महावीरसिह चव्हाण
- कृषी दिनानिमित्त प्रवरेत कृषी-कवी संमेलनाचे आयोजन
लोणी : हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त सपूर्ण महाराष्ट्रात ०१ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त कृषी व सलग्नीत महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी आणि रासेयो संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांच्या संकल्पनेतुन कृषी-कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कवी संमेलनामध्ये मुख्यत्वे शेतकरी व कृषी क्षेत्राशी निगडीत कवितांचे सादरीकरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म.फु.कृ.वि विद्यार्थी कल्याण अधिकारी व कवी डॉ.महावीरसिंग चव्हाण, म.फु.कृ.वि चे डॉ.कैलास कांबळे, प्रवरा कार्यक्षेत्रातील निमंत्रित कवी भास्कर दादा लगड, यशवंत पुलाटे, डॉ. बाबुराव उपाध्ये, म.फु.कृ.वि.चे क्रिडा अधिकारी दिलिप गायकवाड तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, डॉ.विशाल केदारी, डॉ.रोहित उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे डॉ.महावीरसिंह चव्हाण यांनी हरीतक्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषिक्षेत्रात केलेली भरीव कामगिरी, तसेच सामाजिक योगदानासह त्यांच्या जीवनकार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला तसेच हे कृषि-कविता म्हणजे शेतकरी राजाला त्याच्या वेदना व आनंद व्यक्त करण्याचे साधन मानले जाते असे प्रतिपादन करण्यात केले. स्व.वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री असताना कृषी शिक्षणाचा प्रसार केला. त्यामुळे आज पुर्ण महाराष्ट्र हा कृषी शिक्षण घेत आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्राला अन्न धान्यामध्ये स्वयंपुर्ण केले असे वक्तव्य डॉ.शुभांगी साळोखे यांनी केले.
कवी संमेलनाच्या निमित्ताने रासेयो स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. यावेळी दिव्या आटोळे, निकिता साकोरे, तेजश्विनी चौघुले, गोकुळ कुंभार, अदिती कोरडे, विश्वजित घोटेकर, पवार वैष्णवी, काठे आश्लेषा, पुरी ऋतुजा, रोहित गदरे, साक्षी शिंदे, धनश्री शिरशेकर आदी विद्यार्थ्यांनी कवितांचे सादरीकरण केले. यासोबतच उपस्थित असलेले सर्व साहित्यिक व कवी यांनी कृषी सलग्नीत कवितांमार्फत शेतकऱ्याचे जीवन, कृषी क्षेत्राचे योगदान व्यक्त करत असताना श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु.अदिती कोरडे, कु.श्वेता शेळके तसेच स्वागत गीत वैष्णवी पवार, आश्लेषा काठे, वेदिका वरघडे, अश्विनी चासकर, पुरी ऋतुजा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रवीण गायकर, प्रा.संदीप पठारे, प्रा.धिरज कारले, प्रा.अमोल सावंत, प्रा.महेश चंद्रे, प्रा.स्वप्नील नलगे, डॉ.किरण गोंटे तसेच सर्व रासेयो स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या