राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे मध्यवर्ती परिसरातील विविध प्रकल्पांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे, राहुरीचे तहसीलदार फसिउद्दीन शेख, तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे, विभागीय वन अधिकारी वाय.जे. पाचारणे, कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने, कुलगुरुंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल व प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी वृक्षलागवडीचे महत्व सांगतांना माहिती दिली की राहुरी कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात 1 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन असून आज दि. 4 जुलै रोजी मध्यवर्ती परिसरातील विविध प्रकल्पांच्या प्रक्षेत्रावर 20 हजार आंबा, जांभूळ, पेरु, बांबु इ. झाडांची लागवड करण्यात येणार आहे. विद्यापीठात आजपर्यंत 3 लाख 93 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यापैकी 80 टक्के वृक्ष आज चांगल्या अवस्थेत आहेत. यावेळी डॉ. शरद गडाख यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी माहिती देतांना सांगितले की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नांने महाराष्ट्र हरित क्रांतीबरोबरच अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रात 1 जुलै हा दिवस कृषि दिन म्हणुन साजरा केला जातो. याचबरोबर 1 ते 7 जुलै या दरम्यान कृषि सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. आदर्श गाव योजनेतंर्गत पाणलोट क्षेत्र, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प-वनशेती, मध्यवर्ती रोपवाटीका/बियाणे विभागांतर्गत ड विभाग, उद्यानविद्या रोपवाटीका विभाग व अखिल भारतीय समन्वीत वनशेती प्रकल्प, डिग्रस टेकडी या प्रक्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात आली.
या ठिकाणी झालेल्या वृक्ष लागवडीचे नियोजन डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. आनंद सोळंके, डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. भिमराज नजन व डॉ. बाबासाहेब सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वनमहोत्सव कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन डॉ. के.डी. चव्हाण आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. गोकुळ वामन यांनी केले. आज झालेल्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या