पै.अनिल ब्राम्हणे तमनर आखाडा केसरीचा मानकरी

राहुरी शहर / अशोक मंडलिक : हनुमान जयंती उत्सवानिमित्त तमनर आखाडा येथे " तमनर आखाडा केसरी २०२२" भव्य निकाली कुस्ती दि. १५ एप्रिल २०२२ रोजी कुस्ती आखाडा संपन्न झाला. मैदानात ईनाम रक्कम रू. ५०००/- पासून ते रू. १,११,०००/- व चांदीची गदा पर्यंतच्या प्रेक्षनिय निकाली कुस्त्या नेमण्यात आल्या होत्या.

मैदानात इनाम रू. १००/- ते रू. ५०००/- पर्यतच्या १०० कुस्त्या फिरुन जोडण्यात आल्या आणि तमनर आखाडा केसरी २०२२ या पुरस्कारासाठी संयोजक कमिटीच्या वतीने मानाची चांदीची गदा व प्रा.संजय तमनर, प्रा.लक्ष्मण तमनर यांनी रोख ईनाम रू. १,११,०००/- देण्यात आला.

ही क्र.१ नंबरची कुस्ती उत्तर महाराष्ट्र केसरी पै.अनिल ब्राम्हणे विरूद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै.सचिन घोगरे यांची झाली असून या कुस्तीमध्ये पै.अनिल ब्राम्हणे विजयी झाले असून 'तमनर आखाडा केसरी २०२२' या मानाच्या चांदीच्या गदेचा व ईनाम रू. १,११,०००/- रुपयाचा मानकरी ठरला. तरी या मैदानाचे आयोजन तमनर आखाडा हनुमान यात्रा उत्सव कमिटीने केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या