चेहऱ्यावर त्याच्या श्रमाच्या सुरकुत्या...!
त्याच आयुष्याच्या खऱ्या आकृत्या...!!
उन्हातान्हात राबून निघतोय घाम...!
कोण लावील त्याच्या वेदनांना बाम...!!
शेतमालाला कायम बेभरवश्याचा भाव...!
त्याच्या अंतःकरणावर असंख्य घाव...!!
अनिश्चिततेलाही आता महागाईची जोड...!
संघर्षाची कहाणी होईल का गोड...!!
मनात कर्जाच्या ओझ्याचाही धसका...!
एकजुटीने दाखवावा लागेल आता हिसका...!!
निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच फटका...!
मोजतोय तो आता अखेरच्या घटका...!!
_ बाळासाहेब भोर; अ.भा.क्रांतीसेना, संगमनेर
0 टिप्पण्या