अहमदनगर/ जावेद शेख : माळवाडगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे यांना पुणे येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, मत्स्य उत्पादन व राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, नवभारत वृत्तपत्र समूहाचे श्रीनिवास साहेब उपस्थित होते. दैनिक नवभारत वृत्तपत्र समुहाच्या दैनिक नवराष्ट्र यांच्या वतीने आदर्श लोकप्रतिनिधी आदर्श सरपंच पुरस्कार पुणे येथील एस एम जोशी सभागृहात सोमवारी दिनांक २८ मार्च रोजी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची धुरा सांभाळताच गावात विकासाचे मॉडेल तयार करण्यास सुरुवात केली. आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत गावामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू केली याच कामांची दखल घेत नवराष्ट्र भारत यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय नवराष्ट्र आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार चिडे यांना देण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण पुणे येथील एस एम जोशी सभागृहात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना नामदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, संपूर्ण जगभरात कोरोनाने मागील दोन वर्षे हाहाकार केला होता मात्र असे असतांना अनेक लोकप्रतिनिधींनी अनेक समाज उपयोगी कामे राबवून जनसामान्यांना आधार देण्याचे काम केले आणि आज त्याच कामाची पावती म्हणून सर्वच सत्कारमूर्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे मात्र हा पुरस्कार मिळाला म्हणजे तुमच्यावर आणखीन जबाबदारी वाढली असल्याचे ना.भरणे यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात स्वतः च्या लक्ष्मी माता मिल्कच्या माध्यमातून २० बेडचे अद्ययावत रुग्णालय गावात उभारले,तसेच गावातील गरजू नागरिकांना कोरोना काळात अन्नधान्य व किराणा वाटप केले.त्यानंतर गावाला दिलेल्या शब्दांची जाण ठेवत सुमारे चार कोटी रुपयापर्यंत निधी आणून गावातील विविध विकासकामे मार्गी लावण्याची किमया चिडे यांनी करून दाखवली.त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन नवराष्ट्र भारतच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीच्या नवराष्ट्र आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
0 टिप्पण्या