राहुरी : शहरातील गाडगेबाबा आश्रम शाळेत वंचित बहुजन युवा आघाडीकडून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्तरीत्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१वी जयंती अहमदनगर युवा आघाडीचे जिल्हा महासचिव अप्पासाहेब मकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्फुर्तपणे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास युवा वर्गाचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी राजेंद्र वाडेकर, संतोष तनपुरे, प्रविण क्षीरसागर, प्रदिप गलियल, मधुकर साळवे, सुयवशी सर विद्याताई करपे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सामाजिक तसेच उद्योजक, शेतकरी, युवाचा सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमानंतर वसतिगृहातील मुलांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे आभार अप्पासाहेब मकासरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद खंडागळे, महेश बोर्डे, विकास डमाळे, गणेश नारद, औटी यांनी विशेष प्रयत्न केले.
0 टिप्पण्या