श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : शिक्षणाची मूहर्तमेढ रोवणारे महात्मा ज्योतिबा फूले व महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयूक्त जयंती निमित्त शूक्रवार दि.१५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ठीक १० वाजता सहर्षा हाॅल, बोंबले पाटील नगर, रासकर नगर जवळ, श्रीरामपूर याठिकाणी सामाजिक एकता मंच बोंबले पाटील नगर, अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट यांच्या संयूक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे व सचिव वर्षा गायकवाड यांनी दिली.
या स्पर्धेसाठी १) शालेय गट (इ.५ वी ते १० वी) अ) महात्मा ज्योतिबा फूले यांची शैक्षणिक चळवळ, ब) मला समजलेले महात्मा फूले व भारतरत्न डाॅ. बी. आर. आंबेडकर, क) भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष हे विषय आहेत. विजत्यांना प्रथम बक्षिस : रू. १००१/-, द्वितीय बक्षिस : रू. ७०१/-, तृतिय बक्षिस : रू.५०१/-. सर्व बक्षिसे माजी नगरसेवक शशांक रासकर यांच्या सौजन्याने ठेवली आहेत.
महाविद्यालयीन गट ( इ.११ वी पासून पूढे ) अ) समाज सूधारकांमूळे समृध्द झालेली भारतीय संस्कृती, ब) महात्मा फूले व महामानव डाॅ.आंबेडकर यांची सामाजिक दिशा, क )भारतीय संविधान व आजची लोकशाही स्पर्धेकरिता प्रथम बक्षिस : रू.२००१/- डाॅ.प्रा.शैलेंद्र भणगे, चिश्तिया कला वाणिज्य महाविद्यालय खूलताबाद, द्वितीय बक्षिस : रू.१५०१/-मा. पंडितअण्णा बोंबले पाटील, व्हा.चेअरमन बेलापूर सोसायटी, तृतिय बक्षिस : रू.१००१/- श्रीनिवास बिहाणी नगरसेवक न.प.श्रीरामपूर, चतृर्थ बक्षिस : रू.५०१/-पंडितअण्णा बोंबले यांचे सौजन्य मिळाले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सामाजिक एकता मंचचे शाकिर शेख, एस.के.बागूल, अतूल साळूंके, राजेंद्र जैत, सूधाकर बोंबले, संजय लाड, आबासाहेब बोंबले, अनिल जगताप, अभिजित सरोदे, संतोष कूलकर्णी, नितीन कूलकर्णी, उंडे, दिगंबर बेटकर, चंद्रकांत शिरसाठ, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मूश्ताकभाई तांबोळी, महिला अध्यक्ष सौ.स्नेहा कूलकर्णी, उपाध्यक्ष सूनिल कानडे, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे आदी प्रयत्नशील आहेत.
0 टिप्पण्या