अभियंता मारहाण प्रकरणी नगराध्यक्ष औटी यांच्यासह नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सचिन राजभोज यांना मारहाण केल्या प्रकरणी देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी अजित निकत यांना निवेदन देवून नगराध्यक्ष औटी यांच्यासह दोन नगरसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पारनेर नगर पंचायतचे अभियंता सचिन राजभोज यांना नगराध्यक्ष औटी यांच्यासह दोन नगरसेवकांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भरदिवसा कार्यालयात ही मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुनीता कुमावत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण औटी आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी त्यांना न जुमानता मारहाण करत असल्याचा व्हिडीओतून समोर आलं आहे. राजभोज व मुख्याधिकारी कुमावत यांनी माञ नगराध्यक्ष औटी यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल का केली नाही? असा प्रश्न यावेळी कामगार वर्गातून केला जात आहे. अभियंता सचिन राजभोज हे पारनेर नगरपंचायत मध्ये स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता म्हणून काम पाहत आहे. बंद पडलेल्या विज मोटारी जमा करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळेस नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांच्या दोन नगरसेवकांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.

देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या कामगार संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष औटी यांचा निषेध करुन मुख्याधिकारी निकत यांना निवेदन देवुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.यावेळी मनोजकुमार पापडीवाल, सुरेश मोटे, कपिल भावसार, अमोल दातीर, संभाजी वाळके, राजेंद्र चव्हाण, ज्ञानदेव शेटे, सुनील गोसावी, भाऊसाहेब पठारे, सोमनाथ सूर्यवंशी, सुदाम कडू,नागेश भालेकर आदि कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्ष औटी विरोधात गुन्हा दाखल का केला नाही ?
         नगराध्यक्ष औटी यांनी अभियंता सचिन राजभोज यांना नगराध्यक्ष दालनात बोलावून मारहाण केली. कार्यालयातील सीसीटिव्ही मध्ये याचे चिञीकरण झालेले असताना हि मुख्याधिकारी सुनीता कुमावत यांनी सरकारी कामगारास मारहाण झाली असताना हि पोलिसांकडे गुन्हा दाखल का केला नाही. औटी यांच्या जागेवर सर्वसामान्य नागरीक असता तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन विविध प्रकारचे आंदोलने कामगारांनी आंदोलने छेडली असती. परंतू अभियंत्यास मारहाण होवूनही मुख्याधिकारी व कामगार संघटना गप्प का बसले आहेत ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या