कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा. गायकर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय रासेयो पुरस्कार प्रदान

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतांना प्रा.प्रविण गायकर समवेत कुलगुरु डॉ.उज्वला चक्रदेव, कुलगुरू डॉ. ए. एन.पातूरकर, डॉ. प्रशांतकुमार वनंजे, अंकित प्रभु व डॉ.महावीरसिंग चौहान.

लोणी : राष्ट्रीय सेवा योजनेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथे पार पडला. सन २०२०-२१ साठीचा महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय कार्यक्रम अधिकारी प्रशंसा पुरस्कार लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील सहाय्यक प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रविण गायकर यांना देण्यात आला. महाराष्ट्र राज्य शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्रातील विद्यापीठांकडून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यक्रम अधिकाऱ्यांचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गायकर यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रा. गायकर यांना शैक्षणिक कार्यक्रमांसोबतच राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत राबविलेल्या समाजपयोगी उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय कार्यक्रम अधिकारी प्रशंसा पुरस्कार देण्यात आला. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रा.प्रविण गायकर यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथील कुलगुरु डॉ.उज्वला चक्रदेव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. ए. एन.पातूरकर, रासेयो चे राज्यसंपर्क प्रमुख डॉ.प्रशांत कुमार वनंजे, राज्य सल्लागार समितीचे सदस्य अंकित प्रभु तसेच मफुकृवि राहुरी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महावीरसिंग चौहान यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

पुरस्कार मिळाल्यानंतर प्रा.प्रविण गायकर यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, आणि सर्व सहकारी शिक्षक मित्र यांनी कार्य करण्याची संधी दिल्याने तसेच विविध उपक्रम राबविण्यासाठी रासेयो मार्फत नेहमीच मार्गदर्शन दिल्याने संचालक डॉ.महावीरसिंग चौहाण यांचे आभार मानले. तसेच राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याने माझी माझ्या कार्याविषयी असणारी जबाबदारी अधिक वाढली असे समजतो आणि या पुरस्काराचे सर्व श्रेय माझे सर्व स्वयंसेवक, विद्यार्थी आणि माझी आई यांस अर्पण करतो अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

सदर पुरस्काराबद्दल लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, जि.प. मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी व कृषी सलग्नित महाविद्याल्यांच्या संचालिका आणि कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी साळोखे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल केदारी यांनी प्रा. प्रविण गायकर यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या