शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा


शिवव्याख्याते संदीप पाटील औताडे यांचे प्रतिपादन

विजय चिडे/पाचोड : छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाच्या हितासाठी लढले. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते संदीप पाटील औताडे यांनी केले. मुरमा (ता.पैठण) येथे दिनकर मापारी यांच्या वाढदिवसानिमित्त गावात विजय चिडे यांनी शिव व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, उपनिरिक्षक सुरेश माळी, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, युवा सेनेचे राहूल नरवडे, पोलिस नाईक संतोष चव्हाण, बीट जमादर किशोर शिंदे, मुरम्याचे सरपंच शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

औताडे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नव्हते. त्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन विकास करण्याचे काम केले. मात्र, अलिकडच्या काळात शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. कुठल्याही समाजातील श्रीमंत व्यक्ती किंवा राजकारणी नेत्यांनी गरीब शेतकरी व कष्टकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण किंवा मुलींच्या विवाहासाठी सढळ हाताने मदत करण्याची गरज असून, आपण सुध्दा विवाहामध्ये हुंडा घेण्याची किंवा देण्याची प्रथा बंद केली पाहिजे. शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यामुळेच आज आपण शिक्षण घेऊन इतिहासाची माहिती घेऊ शकलो. माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास त्यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून शिवचरित्रातील इतिहासाचे दाखले देत प्रभावीपणे मांडला. त्याला आजच्या युगाची जोड देत त्यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.

त्यांचे व्याख्यान तरुणांमध्ये प्रेरणा अन् नवचैतन्यासाठी स्फूर्तीदायी ठरले. यावेळी माजी चेअरमन रमेश चिडे, मुख्यध्यापक उध्दव दराडे, रामनाथ लेंभे, सुरेश मापारी, तंटामुक्ती अध्यक्ष अरूण फटांगडे, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ बाबरे, ग्रामपंचायत सदस्य गोपिचंद आहेर, आप्पासाहेब शिंदे, जगनाथ भोसले, गोपिचंद चिडे, जालिंदर डवणे, दादासाहेब शिंदे, बंडु चिडे, उध्दव मगरे, पत्रकार सिध्दार्थ मगरे, पत्रकार विजय चिडे, पोलिस पाटील विश्वनाथ मगरे, विकास डवणे, सनि मापारी, ज्ञानेश्वर थावर, योगेश लेंभे, शुभम चिडे, कृष्णा नरवडे, कृष्षा शिंदे यांच्यासह गावातील महिला व तरुणांची मोठी उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या