जादुगार रियाला यशोधन कार्यालयाकडुन श्रीलंका दौऱ्यासाठी शुभेच्छासह मदतीचा हात

संगमनेर शहर - तालुक्यातील निमगाव बु येथील चिमकुली जादुगार रिया भागवत कानवडे हीचा जादूचा डंका आता साता समुद्रापार गाजणार आहे. श्रीलंकेत होणाऱ्या स्पर्धेत जादुगार रिया सहभागी होणार आहे.

या स्पर्धेत जादुगार रिया कानवडे सहभागी होणार असल्याने तिला एक मदतीचा हात म्हणून स.म.भा. थोरात सह.साखर कारखान्याचे संचालक, यशोधन कार्यालय प्रमुख इंद्रजितभाऊ थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन युवक काँग्रेसचे भागवत (बाळासाहेब) कानवडे यांच्या विशेष प्रयत्नातून व इंद्रजितभाऊ थोरात यांच्या माध्यमातुन रिया ला श्रीलंका दौऱ्यासाठी ११,०००/-रुपयांची मदत करण्यात आली. या दौऱ्यासाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य आर एम कातोरे, कृष्णा डेअरीचे चेअरमन रामनाथ कानवडे, युवक काँग्रेस अल्पसंख्याक सरचिटणीस अमीन शेख, जादुगार के भागवत व युवक काँग्रेस, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या