वाघोली - भुमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ही समाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार व सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षभरापासून महाराष्ट्रभर शैक्षणिक, सामाजिक आणि ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी आदर्शवत कार्य करीत आहे, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिका अधीक्षक हरिश्चंद्र कुसळकर यांनी काढले आहे.
यावेळी कुसळकर यांना प्रशासन अधिकारी या पदावरून अधीक्षक या पदावर नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांच्या हस्ते कुसळकर यांचा सन्मान करत ग्रंथ भेट देण्यात आला. यावेळी कुसळकर यांनी सांगितले की भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेची संपूर्ण टीम ही गोरगरिबांकरिता सेवाभावी वृत्तीने आदर्शवत समाजाची सेवा करत आहे. या सामाजिक कार्याचे भाग्य कैलास पवार यांना अत्यंत कमी वयामध्ये लाभले याचा मनस्वी आनंद आहे. पुढे देखील कैलास पवार यांचे गोरगरिबांकरिता महाराष्ट्रभर सुरू असणाऱ्या प्रत्येक उपक्रमात नेहमी सक्रीय सहभाग देण्याचा प्रयत्न केला जाईल असे कुसळकर यांनी म्हटले.
यावेळी पुणे महानगरपालिका प्रशासकीय इमारत येथे हरिश्चंद्र कुसळकर यांना अधीक्षक या पदाची जबाबदारी मिळाल्याने भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
0 टिप्पण्या