सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिलेल्या आश्वासनाची पुर्ती न झाल्यास रस्तारोको करणार - गौसे आजम पदाधिकारी.
अहमदनगर/ जावेद शेख : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रूक येथील श्रीरामपूर- अहमदनगर बायपास रोडवरील दत्त मंदिरासमोरील कोल्हार चौक याठिकाणी मोठी रहदारी असते. वेळोवेळी छोटे अपघात हे दररोज घडतच असतात, मात्र एखाद्या दिवशी संभाव्य मोठा अपघात घडून निर्पराधांची प्राणहाणी होऊ शकते याकरीता सदरील ठिकाणी गतिरोधक बसविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपूर यांच्याकडे येथील गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. ११ जानेवारी २०२२ रोजी एका निवेदनपत्राद्वारे मागणी केली होती.
मात्र सदरील अर्ज देऊन जवळजवळ २ ते अडीच महिन्यांचा कालावधी उलटला गेला. मात्र तरी देखील कुंभकर्णी झोपी गेलेल्या संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभागाने यावर अद्याप कुठलीही कार्यवाही न केल्याने (स्पीड ब्रेकर टाकल्याने) येत्या आठ दिवसांत त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकावे अन्यथा गौसे आजम सेवाभावी संस्थांच्या वतीने कोल्हार चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. २९ मार्च २०२२ रोजी संबंधित विभागास दिले होते.
गौसे आझम सेवाभावी संस्थेच्या या रास्ता रोको आंदोलनाची दखल घेत सा. बां. खात्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात बोलवून कायदेशीर बाबी समजून सांगताना सविस्तर चर्चा केली व चर्चेअंती लवकरच कोल्हार चौक ते दत्त मंदिर स्पीड ब्रेकरसाठी मा.जिल्हाधिकारी, यांची परवानगी आवश्यक असते तरीदेखील रस्त्यावरील वाहतूक तसेच वाहनांची वर्दळ बघता श्रीरामपूर ते राहुरी फॅक्टरी (रा.मा.३६) या रस्त्यावर पुढील आठ दिवसांत (Rubbling Strips) टाकण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम उपविभागाने लेेखी पत्रद्वारे दिलेले आहे. यामुळे गौसे आजम सेवाभावी संस्थेने सदरील रस्तारोको आंदोलन तृर्तास स्थगित केले आहे,मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जर दिलेले आश्वासन पाळले गेले नाही तर आंदोलन हे निश्चित होणारच आहे असेही यावेळी गौसे आजमच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ बोलताना सांगितले.
या वेळी गौसे आजम सेवाभावी संस्थेचे संस्थापक मुख्तार सय्यद, अध्यक्ष सुलतान शेख, उपाध्यक्ष असीम शेख, मुयर मोरे, आरीफ शेख, आयूब शेख, शारूख सय्यद, आयन शेख, उपकार्यध्यक्ष नासिर शेख, हारून अत्तार, मोहसीन सरदार सय्यद, आकाश गाळफाडे, तालुकाध्यक्ष रफीक शाह, मोहसिन ख्वाजाभाई शेख, अलीभाई शेख, विकास चोपडे, मोईन शेख, नासिरभाई शेख आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या