१८ एप्रिल रोजी शिर्डीत इपीएस ९५ पेन्शन धारकांचे राष्ट्रीय अधिवेशन

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : इपीएस ९५ पेन्शन धारकांच्या प्रश्नाबाबत येत्या १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने साई सम्राट लोन्स पिंपळवाडी रोड शिर्डी ता: राहाता येथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

अधिवेशनासाठी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, खा.हिना गावित यांच्या हस्ते व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खा सुजय विखे यांच्या हस्ते निमंत्रण पत्र देऊन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केले आहे. अशी माहिती पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी श्रीरामपूर येथे बैठकीत दिली. मेळाव्याचे आमंत्रण देण्यासाठी सुभाष पोखरकर यांचे समवेत देवीसिंग जाधव, संजय पाटील, भगवंत वाळके, रमेश बहुगुणा, अजित जोशी ( हे खा.सुजय विखे पा. ) यांचे नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे गेले होते. विविध संस्था/उद्योग धंद्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी इपीएस ९५ ही योजना लागू करून सेवानिवृत्त पेन्शनधारकांची एक प्रकारे लुट होत आहे. मिळणारे पेन्शन अत्यंत तुटपुंजे असल्याने हालाखीचे जीवन जगावे लागत आहे.

राष्ट्रीय संघर्ष समिती कमांडर अशोक राउत यांच्या नेतृत्वाखाली गेली ६/७ वर्षे लढत असून देशभर अनेक पकारची आंदोलने केली आहेत. खा हेमामालिनी यांचे पुढाकारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी दोन वेळा सकारात्मक चर्चा झाली असून प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. त्यासाठी पेन्शनधारकांचा आवाज व आक्रोश केंद्र सरकारपर्यंत जाण्यासाठी शिर्डी येथे महामेळावा आयोजित केला आहे. दरमहा पेन्शन ७५००/-व महागाई भत्ता मिळावा, कुटुंबाना मोफत व दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळावी. दि ३१ मे २०१७ चे परिपत्रक रद्द करून उच्च पेन्शनचा मार्ग खुला करावा. योजनेत समाविष्ट असून पेन्शन मिळत नसलेल्यांना दरमहा रु.५०००/- पेन्शन मिळावी आदी मागण्याबाबत मार्गदर्शन होणार आहे. 

या मेळाव्यास देशातील/राज्यातील पेन्शनधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय संघटक सचिव सुभाष पोखरकर, अध्यक्ष महाराष्ट्र स.ना आंबेकर, कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, संघटक डी एस पाटील, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र देवीसिंग जाधव, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र नारायण होन, शिर्डी शहराध्यक्ष दशरथ पवार, जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, जिल्हा उपाध्यक्ष एस के सय्यद, शहराध्यक्ष नगर संजय मुनोत व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या