श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने मृत्यू म्हणजे जीवनाचा अंत नव्हे तर एक नवीन जीवनाची सुरुवात आहे. यावर आपला विश्वास आहे आणि म्हणूनच संपूर्ण ख्रिस्तसभा आपले श्रद्धामय जीवन या पुनरुत्थानावर अवलंबून आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त मृत्यू पावला असताना उठला नसता तर आज ख्रिस्त विश्वास प्रकट केला असता का? त्यांचे शिष्य सुद्धा मृत्यूला घाबरले नाहीत. प्रभू येशूने मृत्यूला एक नवीन जीवन दिले आहे. देवाला पहिले देवाची वाणी ऐकली व हा देव आमच्यामध्ये आहे, आमच्या विचारात आहे, शब्दात आहे, कृतीत आहे, आमच्या जीवनात आहे, म्हणून ते निर्भय होऊन संपूर्ण सृष्टीत आहेत.
आज आपण प्रभू येशूला साक्रामेंत मध्ये पाहतो जे शिष्य घाबरले होते त्यांची मानसिक अवस्था पाहून त्यांना तुम्हाला शांती असो असे सुंदर शब्द दिले. जगाच्या शेवटपर्यंत मी तुमच्याबरोबर असेल. ईश्वरावर विश्वास ठेवणारे आपण ख्रिस्ती राहावे, एकमेकासाठी प्रार्थना करा, जन्म व मृत्यू आपल्या जीवनाचे एक अंग आहे, कोणी जग सोडून गेल्यावर आपण खूप रडतो. आपण जे जीवन ख्रीस्तामध्ये जगतो तेथे मृत्यू नाही. सार्वकालिक जीवन आहे.
आज फा.खेडकर यांचे कुटुंबीय, त्यांचा भाऊ फा. फ्रान्सीस खेडेकर यांचा आज पहिला पुण्यस्मरण दिन साजरा करीत आहोत. मन दु:खी झाले असेल कारण ज्याला आपण पाहत होतो त्याला ऐकत होतो. आता ऐकू शकत नाही, तरी हे सत्य आहे. प्रभू येशू मरणातून पुन्हा उठला म्हणजे ज्याप्रमाणे प्रभू येशू प्रथम पुरुष होता तो मरणातून उठला. त्याच प्रभू येशुप्रमाणे आपण पुन्हा मरणातून उठणार आहोत. हा विश्वास प्रकट करण्यासाठी आपण येथे आलो आहोत. फा. खेडेकर हे धर्मगुरू होऊन २६ वर्ष काम करीत होते. त्यांनी सुद्धा प्रवचनात सांगितले असेल श्रद्धा ठेवा, म्हणून आज त्यांच्या फा. खेडेकर यांच्या माध्यमाने आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू या, हे परमेश्वरा दु:खी आहोत आम्ही, पण तो पुन्हा जिवंत झाला आहे. पुनरुत्थित झाला आहे त्यामुळे आमचा भाऊ सुद्धा पुनरुत्थित होणार आम्ही सुद्धा मृत्यू नंतर पुनरुत्थित होणार म्हणून मनाला शांती मिळते. आमचा विश्वास दृढ कर, आमच्या जिवनात जे काही दिवस अजून आहेत.
जीवन आम्ही राहणारच हे सत्य तुझ्यासाठी तुझ्या गौरवासाठी, तुझ्या शुभ वर्तमानाचा प्रसार करण्यासाठी आम्हाला तशी कृपा दे आशीर्वाद दे अशी प्रार्थना व पवित्र मिस्सा बलिदान प्रसंगी प्रतिपादन स्व. फा.खेडेकर यांच्या स्मृतीदिनी नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डानियल यांनी टिळकनगर संत फ्रान्सिस झेवियर चर्च टिळकनगर येथे केले. यावेळी प्रमुख धर्मगुरू मायकल वाघमारे, फा.भाऊसाहेब संसारे, सतीश कदम, गिल्बर्ट डेनिस आदी सर्व धर्मगुरू सहभागी होते.
याप्रसंगी अनिल दादा धिवर लिखित व ख्रिस्तिना खेडेकर यांच्या संकल्पनेतून “समर्पण”या फा.खेडेकर यांच्या आठवणीना उजाळा देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन महागुरुस्वामी लूरडस डानियल यांच्या हस्ते करण्यात आले. आभार प्रदर्शन ख्रिस्तिना खेडेकर यांनी केले.
0 टिप्पण्या