लोहा : उन्हाची तीव्रता वाढल्याने वाटसरूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथील छावा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कै. आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्मरणार्थ या पाणपोईच्या माध्यमातून शुद्ध व शितल मोफत जलसेवा पुरविण्यात येणार आहे. जेष्ठ व्यापारी रमाकांत सावकार कवटीकवार, लोहा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे, अ.भा. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ पाटील कपाटे यांच्या उपस्थितीत पाणपोईची सुरूवात करण्यात आली.
यावेळी छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार, लोहा न.पा.चे गटनेते करीम शेख, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, सायाळचे सरपंच अण्णाराव पाटील पवार, संतोष फाजगे, कल्याण फाजगे, संतोष पवार, बालाजी ताटे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाटसरूंनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
0 टिप्पण्या