देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : गेल्या चार महिण्यापुर्वीच चोरांनी वैकुंठधाम मधील लोखंडी वजा बीड शवदाहिनी चोरुन नेली होती. सात महिण्यापुर्वीच लोकापर्ण झालेल्या वैकुंठधाम मधील दुसऱ्यांदा घटना घडल्याने नागरीकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे. वैकुंठधाम मधील साहित्य चोरीस गेल्याचा अद्याप तपास लागलेला नसताना. प्रत्येक मानवाचा शेवट हा वैकुंठधाममध्ये होत असतानाही समाजकंठकाने मंगळवारी राञी ते बुधवारी पहाटच्या दरम्यान शवदाहिनीच्या तोडफोड करुन लोखंडी साहित्य चोरुन नेले आहे. या समाजकंठकाचा पोलिसांनी त्वरीत शोध लावावा आशी मागणी नागरिकांतून होत आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिकेने राहुरी फँक्टरी येथे वैकुंठधाम बांधण्यासाठी मोठा खटाटोप केला. वैकुंठधामची जागा जिल्हाधिकारी भोसले यांनी हस्तांतरीत करण्याचे आदेश दिल्याने नगर पालिकेस या ठिकाणी वैकुंठधाम बांधता आले. 11 आँक्टोबर 2021 रोजी या वैकुंठधामचे लोकापर्ण करण्यात आले. या वैकुंठधाम मध्ये दोन शवदाहिनी बसविण्यात आल्या आहेत. या पैकी एका शवदाहिनीवर आज पर्यंत अनेक अंत्यविधी झाले. दुसऱ्या शवदाहिनीवर अद्याप एक हि अंत्यविधी झालेला नव्हता. लोकापर्ण झाल्या नंतर अवघ्या तीन महिन्यांत म्हणजे 12 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात चोरांनी वैकुंठधामकडे आपला मोर्चा वळविला तेथिल शवदाहिनीचे लोखंड वजा बीड खोलुन चोरुन नेण्याचा प्रकार घडला होता. मंगळवारी दि.12 राञी ते बुधवारी दि.13 एप्रिल पहाटच्या दरम्यान अज्ञात समाजकंठकाने वैकुंठधाम मधील शवदाहिनीची तोडफोड करुन मोठ्या प्रमाणात लोखंडवजा बिड चोरुन नेले आहे. समाजकंटकाच्या विकृती विरोधात नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नगरपालिकेने या वैकुंठधाम मध्ये रस्ता दुरुस्ती, पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था, विजेचा प्रश्न, तार कंपाउंड, वृक्ष लागवड वैकुंठधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे बसवले आहेत. सर्व सोयीयुक्त वैकुंठधामचे लोकापर्ण करण्यात आले होते. राहुरी फँक्टरी येथिल नागरीकांनी समाधान व्यक्त केले होते. अवघ्या लोकापर्ण झाल्या नंतर अवघ्या तीन महिण्यात वैकुंठधाम मधील शवदाहिनीचे लोखंड चोरीला गेले होते. चोरांनी हि शेवटच्या जागेवर सुद्धा डल्ला मारण्याचे सोडले नाही. काल अज्ञात समाजकंठकाने तर कहरच केला वैकुंठधाम मधील शवदाहिनीची तोडफोड करुन पाहिजे तेवढे लोखंड चोरुन नेऊन विकृती समाजा समोर आणली आहे.
वैकुंठधाम मध्ये मानवजातीला काळीमा फासणारी घटना घडीली आहे. प्रत्येक मानव जातीचा ज्या वैकुंठधामत आयुष्याचा शेवट होतो. त्याच ठिकाणच्या शवदाहिनीचे लोखंड चोरणाऱ्या विकृत प्रवृत्तीला चांगलाच धडा शिकवला पाहिजे असे तीन महिण्या पुर्वी नागरिकांतून बोलून दाखवले होते. शवदाहिनीच्या चोरीचा तपास पोलिसांना करण्याची विनंती केली होती. परंतू पोलीसांना अद्याप चोर सापडला नाही. तोच चार महिण्यानंतर पुन्हा समाजकंठकाने वैकुंठधाममधील शवदाहिनीची तोडफोड करुन लोखंड चोरुन नेले आहे. आता तरी पोलिस याचा शोध घेतील का? असा प्रश्न येथिल नागरीकांनी विचारला आहे.
... समाजकंठकाची माहिती द्या... पाच हजार रुपयांचे बक्षीस घेवून जा! राहुरी फँक्टरी येथिल अमरधाम मधील शवदाहीनीचे अज्ञात समाजकंठकाने नुकसान करुन लोखंड चोरुन नेले आहे. यापुर्वी अज्ञात चोरट्याने बीड वजा लोखंड चोरुन नेले होते. अवघ्या चार महिन्यांत दुसरी घटना घडली आहे. अज्ञात समाजकंठकाने शवदाहिनीचे तोडफोड करुन चोरी केली आहे. या समाजकंठकाची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. खरी माहिती देणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. असे सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत कदम यांनी जाहीर केले आहे.
...त्या समाजकंठक चोरावर कडक कारावाई करावी; निकतराहुरी फँक्टरी येथे विशेष प्रयत्नातुन वैकुंठधाम बांधण्यात आले आहे. हे वैकुंठधाम बांधताना पुढील तीस ते चाळीस वर्षाचा विचार डोळ्या समोर ठेवून बांधण्यात आले आहे. दोन स्वतंञ शवदाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. तीन महिण्यापुर्वी एका शवदाहिनीचे लोखंड वजा बीड चोरट्यांनी चोरुन नेले होते. पुन्हा चार महिण्यात दुसऱ्यांदा याच वैकुंठधाममध्ये अज्ञात समाजकंठक चोराने पुन्हा शवदाहिनीची तोडफोड करुन लोखंड चोरुन नेले आहे. नगर पालिका प्रशासनाच्यावतीने राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्या अज्ञात समाजकंठक चोराचा शोध घेवून कडक कारवाई करावी असे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले.
0 टिप्पण्या