अहमदनगर/ जावेद शेख : वाळकीच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूक प्रचारास सुरुवात झाली आहे. मतदान शुक्रवार दि. १५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८.०० ते ४.०० या वेळेत न्यु इंग्लिश स्कुल, वाळकी या ठिकाणी होणार आहे.
परिवर्तन पॅनलच्या प्रचारास सुरुवात झाली असून परिवर्तन पॅनलचे रामदास भालसिंग यांनी विरोधकांवर यावेळी हल्लाबोल चढविला. त्यांनी सांगितले की, धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची ही लढाई आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून गावासाठी एक विचाराने स्थापन केलेला परिवर्तन पॅनल असल्याने या परिवर्तन पॅनलचा विजय निश्चित आहे. राजाराम धोंडीबा कासार यांच्यानंतर मात्र ३५ वर्षांमध्ये संस्थेमार्फत डिव्हीडंट सभासदांना वाटण्यात आलेला नाही. त्यामुळे संस्थेत परिवर्तन होणे गरजेचे आहे.
पुढे बोलताना भालसिंग म्हणाले की, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची आम्ही भेट घेतली आहे. निवडणूक होण्याअगोदर जर सोसायटी संदर्भात सविस्तर माहिती मिळाली नाही तर आम्ही मंत्री महोदयांना पुन्हा भेटणार आहोत. भेटीदरम्यान राज्यातील सोसायटींची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून एसपी साहेबांना ही येत्या दोन-तीन दिवसांत निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कासार अनिल अदिनाथ, कासार अरुण नारायण, कासार सतिष मोहन, धोंडे बाळासाहेब निवृत्ती, बोठे अरुन बबन, भालसिंग आप्पासाहेब बाबासाहेब, भालसिंग अंबादास आप्पासाहेब, भालसिंग रामदास बबन, साठे सर्जेराव लक्ष्मण, सौ. कासार अर्चना योगेश, सौ. बोटे शेवंताबाई साहेबराव, मंडलिक विलास कारभारी, झोंड दिलीप पाराजी, दिलीप भालसिंग, विशाल बोठे, भालसिंग ज्ञानदेव भिवा, जगताप नानासाहेब ज्ञानदेव, कासार अंकुश ज्ञानदेव, कासार बाबासाहेब बापू, दळवी मधुकर पंढरीनाथ, धोत्रे गोरख, घोडके गणपत नाना, जंदरे गंगाधर पांडुरंग, जुंदरे सुरेश रामभाऊ, गांगर्डे रामदास तुकाराम, भालसिंग सुदाम गणपत, तावरे आप्पासाहेब बबन, बोठे बाळू रघूनाथ, खरपुडे आशाबाई बाबासाहेब, भालसिंग सुधाराणी रामदास, कासार शोभा भास्कर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या