पेन्शनधारकांना लवकरच गोड आनंदाची बातमी कळेल- कमांडर अशोकराव राउत

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : खा.हेमा मालिनी यांच्या मध्यस्थी व प्रयत्नामुळे आपल्या पेन्शनवाढीच्या प्रश्नाला चालना मिळाली आहे. दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा झाली. प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्या आधी संघटनेने विविध आंदोलने केली. कामगारांचा कोट्यावधी पीएफ चा पैसा सरकारकडे जमा आहे तरी पेन्शनवाढीचा प्रश्न प्रलंबित ठेवल्या जातो. खा. हेमा मालिनी ह्या माझ्या सतत संपर्कात आहे व लवकरच आपल्याला गोड बातमी मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती कमांडर अशोकराव राऊत यांनी अधिवेशनात दिली.

खा. हेमा मालिनी यांनी आजच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी शुभ संदेश पाठविला आहे. त्यात म्हटले की आपण देशभर चांगले कार्य करीत आहात. पेन्शन वाढीसाठी मी पण दोन वर्षापासून फार प्रयत्न करीत आहे. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे. लवकरच आपला प्रश्न मार्गी लागणार आहे. सर्वाना यामुळे आनंद नक्की मिळणार आहे. दि १७ एप्रिल रोजी आपली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक झाली. त्यात फायनान्स संबंधी एक समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आले. त्याच प्रमाणे आपली देशभर संघटना बळकट होत आहे, त्याचा मला अभिमान आहे.

आजचे दि १८ एप्रिल रोजीच्या भव्य दिव्य राष्ट्रीय अधिवेशनासाठी पूर्ण भारतातून विविध २४ ते २५ राज्याचे पदाधिकारी व पेन्शनधारक ७ ते ८ हजाराचे वर एस टी चा संप असून सुद्धा या सभागृहात उपस्थित दिसले यावरून संघटनाची ताकद जाणवते. आदि मार्गदर्शन राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांनी शिर्डी साई सुष्टी येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय अधिवेशन कार्यक्रमात प्रतिपादन केले.
देशातून आलेल्या सर्व प्रतिनिधी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यांना दोन्ही दिवस भाषण करण्याची संधी दिली. अनेक मान्यवर अधिवेशनासाठी आले नसले तरी त्यांनी शुभ संदेश पाठविले आहे. त्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री महेंद्रभाई मुजफारा, रामराजे निंबाळकर आदी खासदार आहेत. राष्ट्रीय अधिवेशन आयोजन प्रमुख पश्चिम भारत संघटक सचिव सुभाष पोखरकर, शिर्डी व जिल्ह्यातील देवीसिंग जाधव, संपतराव समिंदर, भगवंत वाळके, दशरथ पवार, संपत शेळके, राजाराम कोते, पुंजाजी कोते, आडसुळे आदि अनेक सहकार्यानी उत्कृष्ट प्रकारे नियोजन केले. प्रास्तविक व स्वागत सुभाष पोखरकर यांनी केले.

राष्ट्रीय महासचिव विरेंद्रसिंग राजावत, राष्ट्रीय उपाध्यक्ष आसाराम शर्मा, के एस तिवारी, राष्ट्रीय सचिव एस एन मिश्रा, दक्षिण भारत संघटक रमाकांत नरगुंड, पूर्व भारत संघटक तपन दत्ता, तसेच उत्तराखंडचे सुरेंद्र सिंग, पंजाबचे जितेंद्र सिंग, राजस्थानचे योगेंद्र शर्मा, गुजरातचे आर सी पटेल, गोव्याचे गावकर, तामिळनाडू नटराजन, ओरिसा बापू पात्रा, आंध्र लक्ष्मीताई, एस बालाजी, अमियाकुमार दास आदी देशभरातून प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्र संचालन वीरेंद्रसिंग राजावत व आभार प्रदर्शन सुभाष पोखरकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या