◾सलग दुसऱ्या दिवशी पाचोड पोलिसांची धडाकेबाज कारवाईने अवैध धंद्यावाल्याचे धांबे दंणाणले
पाचोड : विरभद्रा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. नांदर (ता.पैठण) येथून विरभद्रा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून करून वाहतूक केल्याप्रकरणी पाचोड पोलिसांनी मंगळवारी (दि.२६) रोजी सकाळी एकब्रास वाळूसह ३५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाळू वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टर, एक जेसीबी, चालक, मालकसह विलास उत्तम जाधव (वय२४), जर्नाधन हरिभाऊ शिंदे (वय३०), महेश कल्याण जगताप (वय२६), आण्णासाहेब शेषराव आरगडे (वय४०), प्रकाश लक्ष्मण भवर(वय३२) हे सर्व रा.दावरवाडी ता.पैठण, आकाश अनिल काळे(वय३२)रा.चौढाळा यांच्या विरूध्द पाचोड पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी राज्य सरकारने नदीपात्रातून वाळू उपसा आणि वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही कायद्याची पायमल्ली करत नदीकाठच्या नांदर येथून सध्या राजरोसपणे वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. विरभद्रा नदीपात्रात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु असल्याची माहीती मंगळवारी (दि२६) सकाळी पाचोड पोलिसांना लागताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक सुरेश माळी, पोलिस नाईक प्रशांत नांदवे, अनिरुद्ध पवार, पवण चव्हाण, विलास काकडे, जीवन गुढेकर यांनी मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी जाऊन अचानक पाहणी केली असता नदीपात्रात पाच वाळूचे ट्रँक्टर व एक जेसेबी आढळून आले यावेळी राँयल्टीची विचाराणा केली असता राँयल्टी नसल्याचे ट्रँक्टर चालक मालकांनी सांगितले. नूकतेच सोमवारी पाहाटे पोलिसांनी हिरडपुरी येथील गोदावरी नदीपात्राततून अवैध वाळू उपसा करणारे दोन ट्रँक्टर पकडले होते. सलग दुसऱ्या दिवशीही पाचोड पोलिसांनीही अवैध वाळू उपसा करणारे वाहने पकडली असून गेल्या दोन दिवसांमध्ये दोन वेगवेगळ्या नदीपात्रात कारवाई करून जवळपास ५० लाख रूपयांची अवैध वाळू वाहतूक पकडण्यात आल्याने वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून (एमएच २० सिएच ८२९६), महींद्रा कंपनीचे ५७५ डिआय (क्र एमएच २० सिआर ४०५८), महींद्रा ५९५ टुब्रो (एमएच २३ टी-१२२९) महीद्रा ५७५ डि आय (एमएच २० सि-२४१७), सोनालीका डिआय-७४५ (क्र एमएच २० ईई-७४९७), जेसीबी (क्र एमएच २० ईएस-१४२७) या सर्व वाहनांवर कार्यवाही करून पाचोड पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रविंद्र आंबेकर सह त्यांचे सहकारी करीत आहेत.

0 टिप्पण्या