अधैव धंदा करणाऱ्या अकरा जणावर विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकांची कारवाई

पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई

पाचोड : पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्यांच्या हर्दीतील पाचोड, आडुळ, विहामांडवा, दावरवाडी, आडगाव सह परिसरातील दहा ते पंधरा गावात अवैधरीत्या विक्री होणाऱ्या देशी दारू व गुटखा विक्रेत्यांवर वेगवेगळ्या ठिकाणच्या दारूच्या अड्डयावर व पान टपऱ्यात विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र औरंगाबाद यांच्या विषेश पथकांने धाड टाकल्याची घटना शनिवार (दि.१६) रोजी घडली आहे. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात आकरा जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना परिक्षेत्र औरंगाबाद यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाचोड पोलीस ठाणे हद्दीत पाचोड सह विहामांडवा, आडूळ येथे काही इसम आपले स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या दारू विक्री, गुटका विक्री करत आहेत या माहीतीवरून सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात, सहा.पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री प्रसन्न परिक्षेत्र औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः पंकज कुमावत व उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालय केज येथील उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना परिक्षेत्र औरंगाबाद यांनी कळविलेल्या माहितीचे ठिकाणी शनिवारी दि.16 रोजी जाऊन विविध ठिकाणांची गोपनीय माहिती काढून विहामांडवा (ता पैठण) येथे ऑनलाईन लॉटरी चालवणारा इसम प्रकाश घोडके यांचे दुकानावर छापा मारून त्यांचे ताब्यातून ऑनलाइन लॉटरी जुगाराचे साहित्य नगदी रुपये असा एकूण ५० हजार ४५० रुपयाचा माल जप्त केला व राहुल बियर बारच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना दारू विक्री करणारा इसम राहुल नागवे यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून देशी-विदेशी एकूण ३१ हजार ४०६ रुपये जप्त केले. तर पाचोड येथील अवैध गुटखा विक्री करणारे कृष्णा अंकुश नाराळे यांच्याकडे ८ हजार रूपयांचा गुटखा सापडला तर बसस्थानकांवरील इरफान पठाण यांच्या टपरीत ४ हजार रूपयांचा गुटखा आढळून आला असुन अन्य दोन ठिकाणी दोन-दोन हजार रुपयांचा माल जप्त केला असून सर्वाना ताब्यात घेतले आहे. तर तिसरीकडे जामखेड (ता.अंबड) येथील अनिल भाऊसाहेब भोजने, ताराचंद्र भाऊसाहेब भोजने यांची आडगाव जावळे शिवारात जमीन असून त्यांच्या शेतातील बोलेरो गाडीसह गोवा, विमल ,राज निवास, अशा ६ लाख ४० हजार ६३५ रुपये किमतीचा माल जप्त करून पाचोड पोलीस ठाणे येथे एकूण 11 आरोपीविरुद्ध एकूण चार गुन्हे दाखल केले आहेत. सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक श्री प्रसन्न परिक्षेत्र औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पीएसआय संतोष भालेराव, मनोज कुलकर्णी, महिला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी साय्यक फौजदार शेषराव यादव पोलीस आमदार बालाजी दराडे, राजू वंजारे, महादेव सातपुते, विकास चोपणे, रामहरी भडाने, सचिन अहंकारे, अशोक मंदे, सचिन डिडोळ, महादेव बहिरवाल, बजरंग इंगोले, अब्दुल सय्यद, खनपटे, धुमाळ, मुंडे, राऊत, आसपाक इनामदार, महिला पोना आशा चौरे यांनी केली आहे.

पाचोड येथील बसस्थानकांतील असणाऱ्या पान टपऱ्यावर बीड जिल्ह्यातील विषेश पोलिस अधिकाऱ्यांसह पथकाने दहा ते पंधरा पान टपऱ्या व देशी दारू, पेट्रोल विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. किरकोळ दोन-तीन रूपयांचा पुडी विकणाऱ्या गुटखा विक्रेत्यावर धाड टाकून काय सिध्द करायचे ? अशी चर्चा पाचोडसह परिसरात जोर धरत आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई करून मोठा मुद्देमाल अधिकारी व कर्मचाऱ्यांने हाती आला नसल्याचे तसेच या कारवाईत वापरण्यात आलेला मुद्देमाल जिल्ह्याबाहेरील हद्दीतून जप्त केला अशी चर्चा सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या