एका रात्रीत उक्कलगांव रोडवर तब्बल सहा दुकाने फोडली; सव्वा लाखांची सोयाबिन चोरीला, मात्र तक्रार देण्यास पुढे येईना.
अहमदनगर/ जावेद शेख : उक्कलगांव रोडवरील असलेल्या रहेमानीयां काँम्प्लेक्समधील मागील बाजुचे पत्रे उचकटून तब्बल पाच दुकाने फोडण्यात आली असुन चोरट्यांनी गल्ल्यातील दहा ते पंधरा हजार रुपये लांबविले आहे. बेलापुरात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या दोन चोरींचा अद्याप तपास लागलेला नसतानाच काल बेलापुर - उक्कलगांव रोडवरील नविन झालेल्या रहेमानियां कॉम्प्लेक्स मधील पत्र्याच्या गाळ्यात असलेल्या दुकानांचे मागील बाजुचे पत्रे उचकटून चार दुकाने फोडण्यात आली असुन या दुकानातील काही रक्कम देखील चोरीस गेलेली आहे,या ठिकाणी असलेले जनता ट्रेडर्स हे दुकान पाठीमागील बाजुकडून फोडण्यात आले असुन त्या दुकानात मोठ्या प्रमाणात माल भरलेला असल्यामुळे नेमका किती रुपयांचा माल चोरीला गेला हे समजु शकलेले नाही. मात्र या ठिकाणी देणगी करीता ठेवण्यात आलेले बाँक्स फोडून त्यातील पैसे लांबविण्यात आले.
त्या ठिकाणी गल्यातील पाच हजार रुपयांची चिल्लर चोरट्याने लंपास केली, त्यानंतर जे.बी. फँशन हे कपड्याचे दुकान फोडण्यात आले. मात्र दुकानात काहीही नसल्यामुळे चोरट्यांनी तेथुन काढता पाय घेतला. या दुकानात गल्ल्यात २५ हजार रुपये रोख होते तसेच काऊंटरला चावी देखील तशीच होती. परंतु दुकानात काहीच सामान नसल्यामुळे गाळा बंद असावा असा गैरसमज झाल्यामुळे गाळा मालक बिनसाद यांचे २५ हजार रुपये वाचले,त्यानंतर अश्पाक बागवान यांचे सेतू कार्यालयही फोडण्यात आले. त्या शेजारी असणारी भोसले डेअरीच्या गाळ्याचाही पत्रा मागील बाजुने उचकटुन दुकानात प्रवेश केला गेला. परंतु तेथील काहीच सामान चोरीला गेले नाही, त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा अरुण गोळे यांच्या अश्विनी मेडीकलकडे वळवीला छतावरील पत्रा कापून चोरट्याने दुकानात प्रवेश केला, गल्ल्यात असणारी चिल्लर तसेच चेकबुक, काही ठेव पावत्या घेवुन चोरट्यांनी तेथुन पोबारा केला. मेडीकलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झालेला आहे. त्याच शेजारी असणाऱ्या ताईसाहेब द फँमीली लेडीज व मेन्स वेअर हे ही दुकान वरील पत्रा उचकटून फोडण्यात आले. तेथील एक ड्रेस व सुट्टे पैसे नेण्यात आले असुन चोरटे हे दोन जण असावेत असा अंदाज आहे.
घटनेची माहीती समजताच बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी घटनास्थळी भेट देवुन माहीती घेतली. बेलापुर बाजार समीतीच्या आवारातून संचेती यांच्या तीस गोण्या सोयाबीनची सुमारे सव्वा लाख रुपयांची चोरी झाली असुन त्यांनी देखील फिर्याद देण्याचे टाळले आहे. बाजार समीतीच्या सेल हाँल मधुन यापूर्वीही बऱ्याच वेळा व्यापाऱ्यांचा माल चोरीस गेलेला आहे. बाजार समीतीने या करीता मजबुत असे सेल हाँल बांधुन द्यावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. याबाबत बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला कुणीही चोरी झाल्याचे कळवीले नाही तसेच पोलीसांकडेही तक्रार दाखल झालेली नाही. सव्वा लाखाची चोरी होवुन देखील व्यापारी गप्प का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
0 टिप्पण्या